मावेमधले बेला, अर्थात सोप्पे बेसनाचे लाडू

पाकातल्या लाडवांपेक्शा पिठीसाखर घातलेले बेसनाचे लाडू सोपे, पण गॅसवर बेसन भाजताना हात दुखून येतो. मरोत ते बेला Vaitag असं होतं अगदी. पण तरला दलालच्या पाककृतीने मायक्रोवेवमधे बेसन भाजून लाडू केले आणि तेव्हापासून गॅसवर बेसन भाजणे मी बंदच केले.
दैनंदिनीवर अमांसाठी हे बेला लिहिले, माधुरीने सांगितलं म्हणून नव्या धाग्यावर पाकृ लिहितेय, तुम्हीही तुमच्या बेलाच्या टिप्स नक्की लिहा.

साहित्यः
बेसन - दोन कप
रवाळ साजूक तूप - पाऊण ते एक कप
पिठीसाखर - दोन कप, त्यातली एखाद दुसरा चमचा पिसा वगळली तरी चालेल.
दूध - दोन चमचे
वेलची, केशर - स्वादासाठी
काजू, बदाम, बेदाणे - सजावटीसाठी

दोन कपाच्या मापात माझे १५ लाडू होतात.

१. दोन कप बेसन मायक्रोवेव कूकिंगसेफ बोलमधे घेऊन त्यात पाऊण कप रवाळ तूप घालायचं. दोन्ही एकत्र करून मावेमधे हाय पॉवरवर २ + २ + २ मिनिटं फिरवायचं.
प्रत्येक दोन मिनिटांनंतर बोल खाली काढून मिश्रण ढवळायचं. पहिल्या राऊंडला ढवळणं थोडं जड जाईल कारण ते सॉलिड स्टेटमधे असेल. पण नंतरच्या प्रत्येक राऊंडला सोपं जाईल कारण तोवर बेसन हलकं झाल्याने मिश्रण पहिल्या राउंडच्या तुलनेत साधारण लिक्विड स्टेटमधे असेल.

२. बेसन ६ मिनिटं मावेत फिरवल्यावर मग आपल्याला हवा तसा रंग येईपर्यंत १-१ किंवा अर्धा-अर्धा मिनिट फिरवायचं.

३. शेवटची राऊंड मावेत ठेवली की दोन चमचे दूध एका वाटीत गॅसवर उकळायला ठेवायचं. मिश्रण खाली काढून त्यात उकळतं दूध घालून ढवळायचं.
ह्यामुळे लाडू खाताना घश्याला तोठरा बसत नाही. ही एक केमिकल रिअ‍ॅक्शन आहे जी मायबोलीवर अखिने, म्हणजे इथल्या दुबईवाल्या दिपालीने शेअर केली होती.

४. मग त्यात वेलची पावडर/ केशर वेलची सिरप घालून मिश्रण गार व्हायला ठेवून द्यायचं.

५. ते गार झालं की त्यात दोन कप पिठीसाखर घालून चांगलं मळून बेदाणे/ काजू/ बदाम वगैरे लावून लाडू वळायचे.

20171023_151359.jpg

माहितीचा स्रोत - तरला दलाल.

अधिकच्या टिपा:
१. तूप जास्त झालंय, लाडू बसताहेत असं वाटलं तर जरा थांबून तूप थिजल्यावर लाडू वळायचे किंवा बेसन कोरडंच मावेमधे काळजीपूर्वक नीट भाजून त्यात घालून नीट मळून लाडू वळायचे.

२. लाडू वळताना मिश्रण अगदी भगराळ वाटलं तर दोन चमचे पातळ तूप घालून मळून लाडू वळायचे.

३. बेसनाच्या प्रमाणावर तुपाचं प्रमाणा अवलंबून आहे. मी चार कप बेसन घेतलं तेव्हा दोन कप तूप कमी पडलं. मला लाडू वळताना दोन तीने चमचेतूप पातळा करून घालावं लागलं. पण दोन कप बेसन भाजलं तेव्हा एक कप तूप जास्त झालं. पाव कप बेसन कोरडंच भाजून त्यात घालावं लागलं.
तूप कमी झालं तर लाडू वळताना घालता येतं पण जास्त झालं आणि लाडवांचा गणपती झाला तर आपला मूड बिघडतो. त्यामुळे बेसन भाजताना सुरूवातीला तूप निम्म्यापेक्शा थोडं कमीच घ्या.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle