आमचे वराती मागून घोडे..
नव- मैत्रिण उपक्रम होऊन खरतर खूप दिवस होऊन गेले.. माझी कविन शी मस्त ओळख झाली.. गप्पा झाल्या ज्या आता मस्त रेग्युलरली होत आहेत, रेसिपी शेअर करून झाल्या.. ती ने तर मी दिलेली रेसिपी लगेच ट्राय केली, , इथे शेअर केली .. माझी मात्र आज करू उद्या करू अस करत करत काल मुहुर्त लागला.. आणि व्व्वा काय अजुन एक पदार्थ मिळाला लेकी साठी आणि आमच्या साठी पण
तर तिने मला दिलेली रेसिपी तिच्याच शब्दात :)
साहित्य :-
बेसन पीठ
ओवा
जीर
बडिशेप
हिंग
हळद
तेल
आवडीचा कोणताही एक मसाला (पावभाजी/ गरम मसाला / चिकन मसाला) --- मी पावभाजी चा मसाला वापरला
मीठ
कोथिंबीर
आल लसूण पेस्ट (ऑप्शनल) --- मी नाही घातली ही पेस्ट
चिंच गुळ चटणी - रेडिमेड किंवा ती नसेल तर चिंच कोळ आणि गुळ लाल तिखट जीर पावडर घालून चटणीला शॉर्टकट रिप्लेसमेंट केली तरी चालेल. आंबट गोड तिखट अशी मिक्स चव येते या चटणीमुळे ती छान लागते >>> माझ्या कडे रेडिमेड नव्हती म्हणुन शॉर्टकट रिप्लेसमेंट केली
हव असेल तर एक चमचा मोहन किंवा एक चमचा ऑलिव्ह ऑइल >> मी एक चमचा मोहन घातलं
कृती:-
बेसन पीठात हे सगळ घालून थोड पाणी घालत कालवायच. भजीच्या पीठाची कंझिस्टंसी झाली पाहीजे
पोळीला एका बाजुला हे मिश्रण लावून घ्यायच
तवा तापत ठेवून. त्यावर तुप /तेल / बटर स्प्रे करायच.
पोळी तव्यावर टाकायची. मिश्रण लावलेली बाजु खाली.
मग पोळी तव्यावर असतांनाच चमच्याने वरच्या बाजुलाही मिश्रण लावायच
बाजुने तेल तुप बटर सोडून बेसन शिजु द्यायच.
एखाद मिनिटात बेसन मिश्रण शिजत जनरली.
बाजु पलटवायची.
त्याबाजुच मिश्रणही शिजू द्यायच
मग खाली उतरवून पिझ्झा कटरने तुकडे करायचे
डिप्स म्हणून टोमॅटो kechap / चटणी किंवा रेडीमेड डिप्स असतील तर ती पण चालतील. नसल काही तरी चालत.
थोड खरपूस भाजल की क्रंची लागत
मस्त थंडी च्या दिवसात, चहा सोबत , स्नॅक्स म्हणुन फारच मस्त ऑप्शन आहे
थॅक्यु कविन (मावशी)