काही काही गोष्टी उगाचच लक्षात राहतात . कॉलेज मध्ये सुहिता म्हणून मुलगी होती. माझ्या ग्रुप मध्ये नव्हती तरी मला ती आठवते . सुहिता शांत मुलगी होती आणि अभ्यासू पण. टिपिकल चोटी गर्ल्स म्हणतात तशी पण खूप छान. कॉलेज मध्ये एक अगदी भावखाऊ ग्रुप असतो, एक अभ्यासू ,एक गरीब आणि एक ओव्हरस्मार्ट . सुहिता अभ्यासू पण सुंदर मुलींच्या ग्रुप मध्ये होती. छान होती. गोरी थोडी शॉर्टच दोन वेण्या . जराशी स्वतःच्या विश्वात असणारी. तर तिचा तसा कॉन्टॅक्ट नव्हता बरेच दिवस. मग मध्ये एकदा मी बहिणीबरोबर ग्रेट साडी खरेदीला गेले म्हणजे टीपीkल सिल्क आणि पदराच्या साड्या मुंजीसाठी हव्या म्हणून. आम्ही साड्या बघायला लागलो . शेजारी एक जण होत्या त्याचा रंग आणि केस आणि आवाज ऐकून वाटलं मला माहिती आहे बहुतेक. पण बहिणीचे आणि माझे साडी ,पदर आणि काठाचा रंग हे equation जुळेना म्हणून मी त्यात लक्ष घातले.
थोड्या वेळाने बघितले तर हि सुहिता होती. मैत्रिणी बरोबर साडी घ्यायला आली होती. केस वेगळे नीटसे ट्रिम केलेले. स्लिम अँड छान. चेहऱ्यावर हसू. आधी लहान वयात माहित असलेल्या व्यक्ती अचानक भेटल्या कि त्या आधी लहान जशा होत्या तशा आठवतात आणि compare केल जातं . तशी मी मनात comparison केली . मला सुहिता शांत वाटली आधीपेक्षा.
आम्ही नंबर घेतले एकमेकींचे आणि निरोप घेतला. मला कॉलेज मधली सुहिता आठवली. तिला कसे सगळे युवराज वरून चीडवायचे ते आठवले. तर second year पर्यंत सुहिता तशी बॅक बेन्चर आणि जास्त लक्षात न राहणारी होती. शांत होती त्यामुळे जास्त फ्रेंड्स नव्हते तिला. ठरलेला ग्रूप . नेहमीच अभ्यास , थोडी मजा बास. तशी डे ड्रीमर होती ती पण त्या वयात अशी स्वप्न बघतात मुली. सेकंड यर ला नवीन ऍडमिशन होऊन युवराज आमच्या batch मध्ये आला आणि सगळ्यांनी सुहिता आणि त्याची जोडी जुळवली सहज चिडवायला म्हणून. युवराज स्मार्ट होता म्हणजे आवडावा तसाच. पण सुहिता घाबरायची ती वरवर हसायची पण वरिड दिसायची. तिचं बोलणं बंदच झाल. लास्ट इयर ला गॅदरिंग ला हि दिसली नाही कुठे. युवराज दुसऱ्याच मुलीबरोबर दिसायचा. आणि मग कॉलेज संपलं . सुहिता च नाव काढलं कि सगळ्यांना ते चिडवणं आठवायचं पण ती आता काय करते हे कोणालाच माहित नाही.
मी थोडे दिवसांनी तिला फोन केला भेटूया म्हणाले आणि मग आम्ही भेटलो. खूप गप्पा मारल्या.
सुहिता एव्हडी बोलेल असं मला वाटलं नव्हतं पण स्वभाव बदलला आहे म्हणाली. तिनेच सिनेमाचा विषय काढला " ती सध्या काय करते? ". मला म्हणाली कि
• जे मला कॉलेज मध्ये ओळखायचे त्यांना मी आठवते या सिनेमे मुले पण तसं काही नव्हतं
• म्हणजे युवराज ( हे नाव खरं नाहीये) handsome होता पण आम्ही कधी बोललो सुद्धा नाही
• तुम्ही चिडवायचात ते मी इग्नोर केलं. पण मग नंतर मला ते खरंच वाटायला लागलं
• मला वाटायला लागलं कि तोच माझा soulmate का काय तो आहे
• मी त्याला वर्गात शोधायचे
• एक दिवस नाही दिसला तर बेचैन व्हायचे - म्हणजे अगदी मिल्स अँड बून मध्ये असते तसे
• मला त्याचे timetable माझ्या पेक्षा जास्त माहित होतं
• काहीही न बोलता मी इन्व्हॉल्व्ह झाले
• पण त्याला मी आवडत नव्हतेच
• मला तो कथेतला राजकुमार वाटत होता
• त्याला अनु आवडायची. . बॅड पार्ट ---- ते मला हसायचे
• मला ते कळलं तेव्हा स्वतःचा राग आला म्हणजे मी उगाच दुसऱ्याचे ऐकून खरं धरून चालले होते
• लास्ट इयर ला मला कळलं कि मी मूर्खपणा करत होते म्हणजे हवेतले मनोरे म्हणतात ना तसं काहीसं
• युवराज ची चूक एवढीच कि त्याने चिडवण्याचा timepass सिरिअसली घेतला नाही आणि मी घेतला
• स्वतःला त्रास करून घेतला, लोंकाच्या हसण्याचा विषय झाले. तब्येत खराब करून घेतली
• ज्या दिवशी कळलं काय घोळ केलाय मी ते ,त्या दिवसापासून मी ब्रेक अप केला - स्वतःच्या ओल्ड सेल्फ शी
• लास्ट इयर ला मी खूप अभ्यास केला मग धो धो मार्क्स मिळवले
• चांगला जॉब मिळवला
• सगळं बदलून टाकलं - मग नंतर अभि शी लग्न झालं - अभि चांगला आहे म्हणजे प्रिन्स चार्मिंग नसेल पण मला समजून घेतो
• ती सध्या काय करते छान आहे पण मला ब्रेक अप नंतर जो कॉन्फिडन्स सापडलाय ना तो बेटर आहे
• कोण सध्या काय करतय ते नको समजायला मी काय करते ते छान आहे ना मग झालं तर
• मला युवराज ला भेटायचे नाहीच we were never together सो काय बोलायचं हा प्रश्नच आहे
कधी कधी ब्रेक अप नवी वाट दाखवतो.