घर
या घरात वावरत नाही आताशा कोणी
तसं फार जुनंही नाहीये घर खरंतर
काही दशकं एवढच वय असेल घराचं
फार लाघवी आहे हे घर
फक्त घरातल्यानाच नाही तर
तर जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांना
अगदी मोलकरानासुद्धा जीव लावायचं हे घर
...
काही वर्षांपूर्वी एक कवडसा खेळायचा घरात
अलीकडे डागडुजी, रंगकाम झाल्यामुळे त्याचही येणं थांबलच कायमच.
...
स्वच्छ उन्ह वारा यावा म्हणून आवर्जून बसवलेल्या फ्रेंच विंडो बंद असतात
आणि त्याच्या आत असणारे जाड दुहेरी पडदे देखील ओढून घेतलेत या घरानी
...
या घराला स्मरत असतात साजरे केलेले अनेक उत्सव
घरातल्या सगळ्यांनी मिळून केलेल्या गमती जमती
त्या दोघांच्या एकांताचे अनेक सोहळे
त्याला बघाव वाटत त्या सगळ्यांना ,
बाहेरच्या जगाला पुन्हा एकदा;
नाही म्हणायला
स्वयंपाक घराच्या exhaust फॅन च्या खिडकीतून
या घराचा अतिशय लाडका लेकुरवाळा औदूंबर तेवढा दिसत राहतो
खूप मोठा झालेला.
~
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle