ती ( भाग - २ )
ही माझी लाडकी मदतनीस व साथीदारीण कोण ?पाहिलत का ? म्हणून तर या- या म्हणत बोलाविले ना. अहो ही माझी आवडती '' gasशेगडी '' गेली ४६ वर्षे मी ती सतत वापरत आहे. लग्ना नंतर इतक्या लवकर मला ' ती ' मिळाली आणि स्वयंपाकासाठी कोळशाची शेगडी किंवा भुसा-शेगडी किंवा स्टोव्ह या साधनांचा उपयोग जास्त करावा लागला नाही जे मला जमत नव्हते.तसेच त्या छोट्या गावात gasएजन्सी नव्हती तर एका दुकानदाराने भोपाळून आणून दिली होती व तोच दोन महिन्यांनी तिचे स्पेशल खाद्य म्हणजे नवीन सिलेंडर आणून देत असे.कालांतराने गावात एजन्सी आली.तिची बटणे फक्त एकदाच बदलली आहेत.
त्याखेरीज कधी कोणताच प्रोब्लेम आला नाही.पण खरेच बटणामुळे नवीन शेगडी घ्यावी लागणार बहुतेक.
म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच.
सगळ्यांना नम्र निवेदन कोणी तिला नवीन बटणे लावून द्यावीत.म्हणजे तिचा दुरावा सहन करावा
लागणार नाही.
मैत्रिणींनो माझी विनंतीची दाखल अवश्य घ्या.घ्याल ना ? :)
'ती' (भाग-१) : https://www.maitrin.com/node/2362
'ती' (भाग-३) : https://www.maitrin.com/node/3223