सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.
लग्न ठरल्यावर श्रीकांत पुण्यात राहिला कारण त्याच ऑफिस पुण्यात अम्मा मुंबईला मोठ्या मुलाकडे. मग सुद्धा श्रीकांत ने घर घेतल्यावर मात्र अम्मा पुण्यात आल्या. सुद्धा रोज भेटायला जायची तवे थोड्या बोलायच्या सूर जरा चढ असायचा. सुधाला "जाड होशील जरा काम करत जा " वगैरे सांगायच्या. सुद्धा ची फिरायची नोकरी त्यामुळे तशी ओढाताण व्हायची म्हणून तिने जास्त लक्ष दिले नाही.
लग्न कुठल्या पध्हद्तीने करायचे ह्यात अम्मांनी पहिला वाद घातला. पारंपरिक पद्धती हव्या मला नवीन काही आवडत नाही. शॉर्टकट नको इतकं मग तसच केल. सुधा बरोबर साडी खरेदीला गेल्या तिच्या पसंतीला नIवे ठेवत सIद्य घेतल्या. अगदी सुधा गोरी पण असून " तुला जांभळा रंग चांगला दिसणार नाही" अस सुद्धा म्हणाल्या. सुधा ने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि हवी ती साडी घेतली श्रीकांत कडे पाहून. मग लग्न झाल्यावर तर दुसऱ्या दिवसापासून सुधा किचन मध्ये आणि अम्मा बाहेर असं सुरु झालं. सुधा साठी म्हणून अम्मांनी ५ चा दूधवाला लावला का तर " तुला उरक नाही सगळं आटपून जात जा ऑफिस ला मी काही करणार नाही आता , सून कशाला आणली मग" सून किचन सांभाळण्यासाठी आणतात का फक्त ? सुधा च्या घरी असं नव्हत आई आजी सगळे मजेत असायचे म्हणजे स्वयंपाक मिळूनच करायच्या. इथे अम्मानI काही विचारल तर " तू मराठी आहेस म्हणून मला घरात नकोच होतीस मला कन्नडिगा हवी होती सून" पण मग तिने अस सगळं ऐकून घेतल असत का हे म्हणल्यावर लगेच श्रीकांत कडे " उलट उत्तर देते " म्हणून तक्रार. सुधाला कस वागावे कळेना. रोज कटकट ऐकून वेड लागेल असा वाटायला लागल. आणि श्रीकांत ची लंडन ला बदली झाली.
मग सगळी गडबड झाली. आधी श्रीकांत जाणार मग सुद्धा असं ठरला. अम्मा चिडल्या रडल्या " सुधाला कशाला नेतोस ठेव इकडेच "म्हणाल्या. सुधा घाबरलीच अम्मांबरोबर कायम राहायचे ते सुद्धा श्रीकांत शिवाय.