कोलंबस आणि भेटीगाठी
इंजियानातलं कोलंबस एक छोटंसं गाव. मुळात हे खूप जुनं गाव. 1821 च्या सुमारास याला कोलंबस हे नाव दिलं गेलं. कोलंबस नावारुपाला आलं के तिथल्या कोलंबस- मॅडिसन रेल्व लाईनमुळे. अनेक उत्पादक संस्था तिथे उभ्या राहिल्या. नोबलिट्ट स्पार्कस इंडस्ट्री ( Noblitt-Sparks Industries) , अॅरव्हिन इंडस्ट्री Arvin Industries - आताची मेरिटॉर (Meritor) , कमिन्स (Cummins, Inc)अशा अनेक इंडस्ट्रिज तिथे निर्माण झाल्या.
नॉर्थ ख्रिश्चन चर्च |
इथून निघतानाच काही मैत्रिणींना भेटता अालं तर काय बहार येईल असा विचार होता :dd: . मोनाली नुकतीच इंडियाना मध्ये गेलेली. तिच्याकडे तर निमंत्रण आधीच लावून घेतलेलं. वंदना नेही आग्रहाचे आमंत्रण दिले होते. आणि स्वाती 2 जवळच रहाते हे कळले होते. या तिघींनाही भेटायची फार इच्छा होती. खर तर अमेरिकेतल्या सगळ्याजणीना भेटायचं होतं. पण वेळ खूपच कमी होता. त्यामुळे या तिघीना तरी भेटायचं असं ठरवल.
मोनाली शी सतत संपर्कात होते त्यामुळे तिच्याकडे लगेचच जाऊन धडकलो. मोनाली, तिचे अहो यांच्याशी भरपूर गप्पा अन दोन गोड मुलांशी दंगा केला. सोबत मोनालीच्या हातची चविष्ट मिसळ! क्या बात! घरही खूप छान सजवलय मोनालीने. खूप मजा आली. निखिलला खूप दिवसांनी कुटुंबाचा फिल तुझ्यामुळे मिळाला, मोनाली थांकु खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून.
स्वाती 2 बद्दल मायाबोलीपासून खूप आदर, उत्सुकता होती. तिला कधीतरी भेटता यावं हि खरच फार मनापासूनची इच्छा होती. रायगड मुळे या इच्छेला मूर्त स्वरूप मिळाले. थांकू राय
स्वाती, तिचे अहो दोघेही अतिशय सहृद्य, अतिशय अगत्यशील. स्वाती अन मी पहिल्यांदा भेटत असूनही काही परकेपणा वाटलाच नाही. तशात पेणच्या धाग्याने आम्ही अजूनच जवळ आलो. स्वाती जशी लिखाणातून दिसते तशीच आहे, शांत, समंजस, विचारी, सॉर्टेड! स्वाती लव्ह यु. आणि स्वातीचे अहो तर जेम पर्सन! निखिल त्यांच्या पेक्षा कितीतरी लहान - वय अनुभव, शिक्षण सगळ्याच बाबतीत. पण त्यांनी इतक्या छान गप्पा मारल्या त्याच्याशी. खूप खूप धन्यवाद . स्वाती, त्यांना माझा नमस्कार सांग ग ___/\___
तू घरही किती सुंदर ठेवलयस आणि तू विणलेले पमकिन्स :thumbs up:
माझ्या लेकाला हाक मारायला हक्काचं एक घर मिळालं :fadfad:
थांकु ग
वंदनाशी मात्र गाठभेट हुकलीच पुढच्यावेळेस नक्की भेटेन ग.फोनवरती गप्पा मात्र पोटभर झाल्या.
रायगडशीही फोनवरून गप्पा झाल्या मनसोक्त. अनयाशीही छान गप्पा झाल्या.
लोलाचीही भेट राहिली.
लेकाचे मित्र सतत येऊन जाऊन होते. कधी उप्पीट, कधी कांदाभजी तर कधी भेळ अशा छोट्या पार्ट्या तर झाल्याच. त्या सगळ्यांशी खूप छान संवादही झाला. लेकाचे आता पर्यंतचे सगळे मित्र माझेही मित्र झाले होते. तसच इथेही घडलं. परतायच्या आधी सगळ्यांना चिकन बिर्याणी ही खिलवली. सगळे खुष ! लेकाचे हे काही जुने मित्र, काही नवे. पण सगळे एकमेकांना धरून रहात होते हे बघूनही खूप छान वाटलं :)