जात बोलते काही बाही
जात बोलते काहीबाही
इतिहासाची फुटते लाही
आम्ही मोठे आम्ही जेते
दंड थोपटून तयार बाही
अमुचे पूर्वज गाऊ गाथा
कुणास वाटो त्राही त्राही
पेच भयंकर दुही दिसावी
नको घडाया ऐसे काही
पुन्हा एकदा उलटू पाने
समजुन घेऊ ती शिवशाही
~कामिनी फडणीस केंभावी