रण आॅफ कच्छ (प्रवास दैनंदिनी) :२

२९/१/२०१८

एक उनाड सकाळ

जेशी क्रुष्ण ! जय श्री क्रुष्ण अभिवादनाने प्रसन्न सकाळ झाली. आज्यांचे प्रात:स्मरण सुरू झाले होते व एकीकडे चहाची लगबग सुरू होती. कांकरिया तलावावर माॅर्निंग वाॅकला जायचं व नाश्ता करूनच परतायचा प्लॅन माधवने ठरवला होता. गाईड, घरचा कर्ता पुरुष व आईची जबाबदारी स्वत:कडे घेत तिन्ही भूमिका समजूतदारपणे, उत्साहाने पार पाडत होता. मावशीचे अर्धो कल्लाकाने जाऊ, मी आज दौडणार नाही गुजराथी अनुवादित मराठी ऐकायला मजा येत होती. त्याला काही सुचवायला म्हटलं की त्याचं उत्तर असायचं 'वांधो नथी' ही टॅग लाईन मला फारच आवडली. मनातल्या मनात म्हणायला सुरूवात केली तर लक्षात आलं आपण उगीचच्या उगीच वांधे करत बसतो. वांधो नथी :)

IMG-20180202-WA0016.jpg

IMG-20180202-WA0018.jpg

काॅलेजमध्ये असताना आम्ही दोघी बहिणी एकदा उन्हाळ्याच्या सुटीत अहमदाबादला आलो होतो, तेव्हा काका काकुंनी कांकरियाला नव्यानेच सुरू झालेले म्युझिकल फाऊंटन बघायला आणले होते. तेव्हा पहिल्यांदा इथली प्रसिध्द पावभाजी खाल्ली होती. पण आता पावभाजी बरोबरच प्रांतोप्रांतीच्या पंगतीला देशीविदेशी आलेले पदार्थ दिमाखाने बसले आहेत. आपणही त्यांना सामावून घेतलंय. संध्याकाळी चालू होणारे म्युझिकल फव्वारे अजूनही चालू स्थितीत आहेत. ही सगळी मजा पाहायला संध्याकाळी यायला हवं. पण गर्दीची आम्हाला सवय नसल्यामुळे सकाळी जायचा प्लॅनवर शिक्कामोर्ब केलं.

तलाव खूप स्वच्छ आहे. आरोग्य सजगता देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढल्याने सकाळीही तितकीच गर्दी होती चिल्लेपाल्ले वगळता.

IMG-20180202-WA0015.jpg

कांकरिया तलाव फिरून बाहेर पडलो घटवलेल्या क्यॅलरी भरून काढायला. सुरुवात हेल्दी मिक्स वेज सूपने केली. स्ट्रीट फूड म्हणजे ट्रीट! विविध पदार्थांची रेलचेल. लिज्जत रेस्टाॅरेंटचा लाईव ढोकळा प्रसिध्द आहे पण ते नऊ वाजता उघडत त्यामुळे ढोकळा ठेल्यावरच खाल्ला. ठेल्यांची रांगच रांग आणि प्रत्येकाकडे गर्दी. आधी एक चक्कर मारून सर्वे केला अन 'खिचू' पासून आरंभ केला. बरेच पदार्थ चाखायचे म्हणून वन बाय थ्री करत बन मस्का, खिचू (तांदळाच्या उकडीवर कच्चं तेल, तिखट व मसाला भुरभुरवलेला) लाईव ढोकळा.

IMG-20180202-WA0013.jpg

IMG-20180202-WA0012.jpg

IMG-20180202-WA0014.jpg

पोहे काय आपण नेहमीच खातो न, मग नको मागवायला. पण शेजारच्या ठेल्यावरचे सजवलेली पोह्याची प्लेट पाहून हो, पोहेच जरी असले तरी प्रत्येक घरची, प्रत्येक ठेल्यावरची चव वेगळी ना, आणि हो, नंतर उगीच रुखरुख नको म्हणत मागवलेच. अशी ही खादाड उनाड सकाळ!
आमच्या टूरमध्ये अहमदाबाद दर्शन होणारच होतं. त्यामुळे बाहेर गेलोच नाही. कित्येक वर्षांनी सगळ्यांना प्रत्यक्ष भेटत होतो . घरीच गप्पा मारण्यात एकमेकांच्या सहवासात घालवला. गोपी, नीताची लाॅ शिकणारी मुलगी संध्याकाळी एका ट्रीपहून परत आली तिही आमच्या गप्पात सामील झाली. तोंडी लावायला मज्जा नु लाईफचा वडापाव ! खादाडी, खादाडी अन् खादाडी continued... शेजारीच एक बेन कुर्ती विकते तिच्याकडे थोडी खरेदी केली. मनाजोगता, समाधानकारक दिवस!

३०/१/२०१८

आजपासून टूर सुरू होणार. प्रवासी कंपनी बरोबरचा हा पहिलाच अनुभव. गोपीची काॅलेजला जायची व आमची निघायची एकच वेळ अन तिच्या वाटेवरच आमचं हाॅटेल असा योग! ती सोडणार असल्याने निश्चींत झोप लागली. सकाळी 'आव जो' 'आव जो' करत सगळ्यांचा जड अंत:करणाने निरोप घेतला. साडेआठ वाजता मुंबई, पुणे बसने, ट्रेनने येणार्यांना हाॅटेल मेट्रोपोलमध्ये एकत्र यायला सांगितलं होतं.

आमच्यासाठी वंदना व जिजू सोडून बाकी अनोळखी होते. टूर कंपनीने पुण्यात सहप्रवाश्यांच गटग ठेवलं होतं त्यामुळे त्यांची आपआपसात ओळख झालेली होती. वयोगट चाळीस ते सत्तरी अपवाद होत्या मुली सोबत आलेल्या ऐंशी वर्षाच्या आजी . दोन पुण्याची पारशी जोडपी मराठी बोलणारी, गुज्जु, मल्याळी असा मिक्स ग्रुप होता. तारांकित हाॅटेलमधला ब्रेकफास्ट करून निघालो. बसमध्ये चढायला -उतरायला एक लोखंडी स्टूल जेव्हा जेव्हा ठेवला जायचा तेव्हा तेव्हा पूर्वांचल आठवायचे. तिथल्या बसच्या पायर्या खूप उंच असतात पण त्यांना स्टूलची गरज कधी वाटतंच नाही. चटकन कोणीही हात देतं.

अहमदाबाद ते भूज नऊ दहा तासांचा प्रवास. हाॅनेस्ट रेस्टाॅरेंटची चेन हायवेवर थोड्या थोड्या अंतरावर दिसत होती. दुपारचं जेवण काठियावाडी/गुजराथी घेतलं. रस्ते चांगले पण लांबच लांब! रस्त्याच्या दोन्ही बाजूला एरंडेल, कापूस व मिठाची शेती. भूजच्या जवळ जसं जसं जात होतो तसं तसं दोन्ही बाजूला सपाट ओसाड जमीन! गांवही दूर दूर. मनुष्य वस्ती तुरळक! मध्ये मध्ये उंटांचे कळप चरत होते. टूर मालक जयेश दिल्लीहून आला होता. तिथून त्याने तोंडात टाकायला बरेच प्रकार आणले होते त्यापैकी गुडगट्टे, गुळाच्या कांड्या मस्त होत्या.

संध्याकाळी हाॅटेल हिल व्ह्यु मध्ये पोचलो. छोटीशी ओळख परेड झाली. आम्ही नागपूरकर अल्पसंख्यक पण बर्याच जणांच नागपूरशी काही ना काही कनेक्शन निघालं. भूजमध्ये शिरतांना वाटेत भुकंपाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या अर्थात सतरा वर्ष उलटली होती म्हणा.

IMG-20180202-WA0019.jpg

भूजमधल्या प्रसिध्द हाॅटेल 'प्रिन्स' मध्ये जेवायला गेलो. थाळीचा आकार बघूनच जीव दडपला. सगळंच जेवण छान होतं पण जिलबी और हलवे का जवाब नही. पोट भरलं पण मन नाही.

IMG-20180202-WA0020.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle