२८/१/२०१८
नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला? विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का ? माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं ! दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला. निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक पण 'पण' असतात.
एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...
भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात.