आमच्या शाळेच्या मैत्रिणींची "जिंदगी ना मिलेगी दोबारा" ट्रिप !

परवा बस्केने सहज मला आमच्या शाळेच्या परदेशातील रियुनियन बद्दल विचारलं आणि मी सहज हा छोटेखानी लेख लिहिण्याचा प्रयत्न केला.

तर होतं असं कि आम्ही शाळेच्या मैत्रिणींनी बरेच वेळा रेस्टारंट मध्ये किंवा कुणाच्या घरी खूप वेळा गेट-टुगेदर्स केली आहेत. आमच्यापैकी कुणी पुण्यात गेलं कि आवर्जून आम्ही भेटतोच . एकदा बोलता बोलता आम्ही ठरवलं कि तेच ते टिपिकल असं गेट-टुगेदर करण्यापेक्षा आपण एक वर्ष परदेशात ग्रँड गेट-टुगेदर करूयात. नंतर वॉट्स-ऍप ग्रुप वर ह्या बद्दल आम्ही अधून मधून बोलायला लागलो. नुसतंच बडबड करणं आमच्या शाळेला शोभलं नसतं ..मग सिरिअस चर्चा सुरु झाली. प्रत्येकीने आपल्याला कुठे जायला आवडेल हे सांगितलं. आम्ही शाळेतल्या मैत्रिणी जगभरात वेगवेगळ्या देशात पसरलो असल्याने खूप ऑप्शन्स यायला लागले.

आधी वाटलं कि अमेरिकेत ठरवावं पण खूप जणींना खूप लांब पडलं असतं ते . आणि व्हिसा पण अगदी इझी नाही सो तो ऑप्शन बाद . यूके मध्ये जायचं तर २-४ दिवस पुरले नसते आणि व्हिसा ची कटकट पण आलीच. आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने जे ठरवू ते ठिकाण इकॉनॉमिकल हवं होतं आणि भारतापासून फार लांब नको होतं. मग यूस / यूके रुल्ड आऊट.
आमची एक मैत्रीण थायलंड ला राहते. ती म्हणाली कि थायलंड भारताच्या तसं जवळ आहे आणि तिकडे "व्हिसा ऑन आरायव्हल " आहे. बँकॉक ला करायचं का?
मग आमचं नेहमीप्रमाणे वोटींग सुरु झालं. थायलंड ला खूप वोट्स मिळाले . मग सर्वानुमते बँकॉक फायनल झालं . मग तारखा आणि महिना ह्याबद्दल चर्चा सुरु. हि चर्चा खूप दिवस चालू होती.परत वोटिंग करून मग डिसेंबर फायनल झाला (आमच्यापैकी खूप जणी US /UK वरून डिसेंबर मध्ये भारतात येतात सो डिसेंबर सोयीचा होता)

नवरा आणि मुलं आणायची नाहीत. फक्त आम्ही मुलींनीच भेटायचं असं ठरवलं आम्ही.. वेगवेगळ्या देशात ,राज्यात स्थायिक असलेल्या मुलींच्या नोकऱ्या ,रजा , घर-संसार , मुलंबाळं आणि बाकी सगळं सांभाळून ठराविक डेट्स ला एका वेगळ्याच देशात ४-५ दिवस जायचं हे काही सोपं काम नव्हतं.

माझ्या २ वर्षाच्या पिल्लाला मी कधी २४ तास पण सोडून राहिले नव्हते तर एकदम एक आठवडा तिला सोडून कसं जाणार आणि ते सुद्धा परदेशात असं मला वाटत होतं पण माझ्या घरच्यांनी मला सांगितलं कि तू अलिशा ची अजिबात काळजी करू नकोस. तू मस्त एन्जॉय करून ये. (मागच्या वर्षी माझं पिल्लू जेमतेम १ वर्षाचं असताना तिच्या ३ मोठया सर्जरीज झाल्या होत्या सो मागच्या वर्षी भारतवारी खूप स्ट्रेसफुल झाली होती सो मी जरा छान ब्रेक घ्यावा असं माझ्या नवऱ्याला आणि घरच्यांना वाटतं होतं) मग मी माझ्या मनाला तयार केलं ट्रिप साठी. बँकॉक ट्रिप साठी मी आधी इंडिया ट्रिप प्लॅन केली.

ट्रिप म्हंटलं कि शॉपिंग आलीच . ट्रिप साठी शॉपिंग सुरु झाली. एक दिवस सगळ्यांनी रेड कलर चा वन-पीस घालायचा असं ठरलं. आधी ब्लॅक कलर ठरला होता पण परत वोटिंग होऊन रेड कलर सर्वानुमते ठरला. (आम्ही सगळीकडे वोटिंग करतो Cool ). व्हिसा साठी हवी असलेली कागदपत्र जमवली. बँकॉक च्या मैत्रिणीने पण व्हिसा साठी सगळ्यांना इन्व्हिटेशन लेटर्स पाठवली. २ दिवस सगळ्यांनी एकत्र रिसॉर्ट मध्ये राहायचं असं ठरलं . मग आमच्या मैत्रिणीने ३-४ मस्त रिसॉर्ट्स चे ऑप्शन्स दिले आम्हाला. सगळी रिसॉर्ट्स मस्तच होती. मग काय.. परत वोटिंग. :ड मग बँकॉक जवळ hua-hin म्हणून एक प्लेस आहे तिकडे राहायचं ठरलं. त्या प्रमाणे बुकिंग झालं . आता ग्रुप वर ट्रिप साठी छान वातावरण निर्मिती झाली होती. निघायच्या १-२ दिवस आधी आम्ही एकमेकींना पासपोर्ट आणि रेड ड्रेस घेतलाय ना हे कन्फर्म केलं. :dhakdhak:

प्रत्येकीने आपापल्या सोयीने फ्लाईटचं बुकिंग केलं होतं. पुण्यावरून आम्ही काही जणी मुंबई एअरपोर्ट ला एकत्र गेलो. माझ्या घरातूनच पहिला पिकअप होता. गाडीत आमच्या नॉन-स्टॉप गप्पा चालू. फूडमॉल ला ब्रेक घेतला. फ्रेश झालो. आपण खरंच असं ठरवलंय आणि प्रत्यक्ष जात आहोत म्हणून खुश होतो. आमचं विमान बँकॉक च्या सुर्वणभूमी एअरपोर्ट ला लँड झालं. ड्राइव्हरबरोबर तोडकंमोडकं इंग्लिश बोलत आम्ही मैत्रिणीच्या घरी पोचलो.
अमेरिका, यूके , ऑस्ट्रेलिया ,सिंगापूर , बॅंगलोर , हैदराबाद आणि पुणे अशा वेगवेगळ्या ठिकणांवरून ठरल्या प्रमाणे सगळ्या मुली घरी जमा झाल्या.

आमच्या पैकी खूप जणी दहावीनंतर पहिल्यांदाच एकमेकींना भेटलो. .. झालं . मोठमोठ्या आवाजात जोरजोरात गप्पा सुरु झाल्या. रात्रभर मैत्रिणीचं घर डोक्यावर घेतलं. साईट-सियिंग साठी २ मोठ्या गाड्या बुक केल्या होत्या. २ दिवस आम्ही भटक भटक भटकलो. आजूबाजूची बरीच ठिकाणं बघून झाली. कार मध्ये पण इतक्या नॉनस्टॉप मोठ्यांदा गप्पा कि ड्राइवर ने कानात हेडफोन घातले. :ड
एकत्र शॉपिंग केली. एकत्र शॉपिंग करायला खूप मज्जा आली . खूप भटकंती केली. रिसॉर्ट मध्ये एक दिवस सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे रेड कलर चा वनपीस घातला. इटालियन डिनर झालं . डान्स केला. खुप्प फोटो काढले. परत रात्रभर गप्पा आणि कॉफी. एक दिवस बीच वर खूप वेळ गप्पा आणि गाणी . 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं "उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे" हे गाणं आम्हाला सगळ्यांना एकत्र चक्क सुरात गाता आलं . धमाल केली. एकमेकींचा निरोप घेत, खूप छान आठवणी घेऊन आम्ही आपापल्या घरी परतलो.

आम्ही साधारण ४-५ महिने आधी ह्या ट्रीपचं प्लांनिंग केलं होतं . आमच्या बँकॉक च्या मैत्रिणीने खूप इनिशिएटिव्ह घेतला आणि प्रत्येकीच्या नवऱ्याने/घरच्यांनी सहकार्य केलं म्हणून खरं तर शक्य झालं.

आमच्या पैकी काही जणींचे नवरे म्हणाले कि आम्ही मुलं इथल्याइथे लोणावळ्याला अजून १ दिवस राहायचं प्लांनिंगच करत आहोत आणि तुम्ही बँकॉक ला जाऊन पण आलात.

काही जणींना खूप इच्छा असून येता आलं नव्हतं मग आम्ही सगळ्यांनी पुण्यात पण एक मोठं गेटटुगेदर ठरवलं. तिकडे पण मोठ्या संख्येने मुली आल्या.
अशा तऱ्हेने आमची "जिंदगी ना मिलेगी दोबारा" ट्रिप यशस्वी झाली. :)

बरं आमच्या शाळेचं नाव सांगायची गरजच नाही. अर्थात पुण्याची हुजूरपागा. Cool

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle