प्रत्येकच ठिकाणी बागकाम करताना वेगवेगळी आव्हाने असतात , कुठे खूप थंडी , कुठे खूप बर्फ , तर कुठे खूप गरम ...
त्यामुळे प्रत्येक ठिकाणी झाडांची काळजीही वेगवेगळ्या पध्दतीने घ्यावी लागते ..
इथे ६ महीने बरच कडक ऊन असत आणि तेव्हा बरीच वाळूची वादळे (sandstorms) येतात .. हवेतच इतका उष्मा असतो कि झाड सुकून जातात.. तसेच सर्वत्र वाळूच असल्यामुळे खजूर , बाभळी/बोरी गटातली झाडे, कडुलिंब व धमस (Conocarpus lancifolius )म्हणून एक झाड अशी इतपतच वृक्षसंपदा !
मातीच/वाळूच भुसभुशीत असल्याने डेरेदार झाड फारशी नसतात.
इथे जी माती मिळते ते उंटाचे खत असते , आणि त्यावर soil mixture असेच लिहीलेले असते. ती थोडी वाळूमध्ये मिसळूनच वापरावी लागते अस आम्हाला इथल्या नर्सरीमध्ये सांगितले होते. आधी मी एक खत वापरायचे , हल्ली नविन टीप मिळाली म्हणजे , २ आठवड्याने प्रत्येक झाडात , जिथे पाण्याने खळ पडत तिथे , मूठ मूठ माती घालायची... ह्यामुळे फरक पडतोय अस वाटतय...
नोव्हे- मार्च एवढेच बागकामाचे दिवस. कारण एकदा वादळे सुरु झाली कि कुंड्या पडतात झाडांसकट , एवढा जोर असतो वार्यामध्ये ... छोटी झाड तर पाणी घालून पण सुकून जातात. कारण हवेतच इतकी गर्मी असते. मी सध्या कुंडीतच धमस ची झाड लावली आहेत , आणि त्याच्या सावलीत छोटी झाड उन्हाळ्यात ठेवायचे ठरवले आहे , बघु काही फरक पडतो का..
हे सगळे सांगायच कारण म्हणजे , निसर्ग माझा सखा वर टाकलेल्या बटाट्याचे फोटो... एका बटाट्याला मोड आले म्हणून तो कापून लावला तर छान ३-४ मध्यम आकाराचे बटाटे आले ... बटाटे पहिल्यांदाच लावले. कांदा ,लसूण पात, टोमॅटो , मेथी , मिरच्या , गाजर, पालक , कारली हे लावते दरवर्षी.
अशीच आणि एक ह्यावर्षीची मज्जा म्हणजे वाल पापडीच्या शेंगा. वाल बरणीत भरताना थोडे सांडले आणि मग ते कुंडीत टाकले , तर जानेवरीमध्ये एकावेळी वाल बटाटा भाजी झाली...
हा धागा वाळवंटातील बागकामाबद्दल चर्चा करण्यासाठी... तुम्ही पण तुमच्या टीप्स नक्की सांगा