आत्ता मभादित अनेकींनी मस्त कविता केल्यात. काहींनी पहिल्यांदाच लिहिल्यात.
असे शब्द देऊन कविता लिहीणं चॅलेंजिंग आणि रिलिविंग दोन्ही आहे. माझ्यासारख्या आळशांना शब्द मिळाले की पुश मिळतो, एक आराखडा मिळतो लिहायला. आणि लिहून होतंच.
तर आपण एखादा शब्द घेऊन छोट्या मोठ्या कविता करूयात?
सुरुवातीला शब्द देऊ या. मग आधीच्या कवितेतल्या शब्दावरून, थीमवरून पुढं जाता येईलच.
दोनोळ्या , चारोळ्या लिहाव्यात असं वाटतंय. पण मोठी कविता सुचली तरी हरकत काय? नाही का? द बिगर द बेटर. फक्त मोठी कविता झाली तर वेगळा धागा काढून टाकावा. योग्य ते अटेंशन मिळण्यासाठी. काय म्हणता? करू या सुरू?
शब्द देऊ का?
ऋतू
हवा
नदी
प्राण
यातला कुठलाही एक किंवा जास्त.