संपदा ने वेस्ट कोस्ट च्या भटकंतीचा धागा काढला, आदिती ने शिकागो चा मग मी ईस्ट कोस्ट चा का नको काढू
आम्ही ऑगस्टमध्ये डिसी प्लान करत आहोत. तर तिथे लोकल फिरायच्या, आजुबाजूच्या जागा ह्याबद्दल माहिती हवी आहे.
आम्ही शुक्रवारी १० ऑगस्ट ला बोस्टन ला पोहोचू. तिथे सोमवार पर्यंत असू.
१४ ऑगस्ट. ला डिसी ला येऊ.
नवर्याची कंपनीची कॉन्फरन्स आहे १५-१८ तेंव्हा तो तिथे बिझी असेल. तर त्या दरम्यान मला आणि लेकीला जवळपास दिवसभर कुठे फिरता येईल? पब्लिक ट्रास्नपोर्ट कसा आहेका? मैत्रिण मैफिल जमू शकेल का?
१४ आणि १५ चा दिवस आम्हा तिघांना एकत्र वेळ आहे तर काय पहावे?
१८ ला कॉन्फरन्स संपली ( एकदाची) की मग तो पण फिरायला मोकळा..
१८- २५ ऑगस्ट च्या दरम्यान बाल्टिमोर , नायगरा करायचा प्लान आहे. तर ह्या दरम्यान अजून काय काय पाहू शकतो.
१००० आयलंड वर नायगर्याहुन जाऊ शकतो का? कसे ?
२६ ऑगस्ट ला डिसी हून वापसी चे तिकीट आहे.