संपदाने वेस्ट कोस्टच्या भटकंतीचा धागा काढला, आदिती ने शिकागो चा मग मी ईस्ट कोस्ट चा का नको काढू
आम्ही ऑगस्ट मध्ये डिसी प्लान करत आहोत. तर तिथे लोकल फिरायच्या, आजुबाजूच्या जागा ह्या बद्दल माहिती हवी आहे.
आम्ही शुक्रवारी १० ऑगस्ट ला बोस्टन ला पोहोचू. तिथे सोमवार पर्यंत असू.
१४ ऑगस्ट. ला डिसी ला येऊ.
नवर्याची कंपनीची कॉन्फरन्स आहे १५-१८ तेंव्हा तो तिथे बिझी असेल. तर त्या दरम्यान मला आणि लेकीला जवळपास दिवसभर कुठे फिरता येईल? पब्लिक ट्रास्नपोर्ट कसा आहेका? मैत्रिण मैफिल जमू शकेल का?
१४ आणि १५ चा दिवस आम्हा तिघांना एकत्र वेळ आहे तर काय पहावे?
मी आयुष्यात पहिल्यांदा अमेरिकेला जाणार आहे. शिकागोपासून १ तासाच्या अंतरावर ट्रेनिंग आहे. २५ एप्रिलला ट्रेनिंग संपेल. मग मी २ दिवस् सुट्टी टाकली आहे.
२५ एप्रिल संध्याकाळ ते २९ एप्रिल असा फिरण्यासाठी वेळ आहे माझ्याकडे. ३० एप्रिलला भारतात परत यायचे आहे.
मी एकटीच फिरणार आहे.
तर कुठे जाऊ, कशी जाऊ, काय बघू? कुठले मुख्य पटेल पॉईंट्स बघु? कितीही सुरक्शित शहर असेल तरी कुठलातरी भाग असुरक्शित असतो. तो कसा शोधू आणि टाळू?
महत्वाच्या गोष्टी:
१. मी रुपयात कमवते. रोजचा विमान प्रवास खूप महाग पडेल. त्यामुळे एकाच ठिकाणी जाऊन राहुन जवळपासचे बघायचे असा विचार आहे.