पाँडिचरीहुन परत जाताना हायवेच्या थोडसं आतमधे - २ तासाच्या अंतरावर महाबलीपुरम!
ह्या गावाच आताच नाव 'मल्ल्मपुरम' , महा बली - बळी देणे ह्याची भिती म्ह्णुन लोक इथे राहायला तयार नव्हती म्हणुन नाव बदललं असं टुर गाईडने सांगितलं
महाबलीपुरममधे सातव्या अन आठव्या शतकातील मोन्युमेंटस आहेत - पांड्व रथ , Descent of the Ganges, सी शोअर टेम्पल, Arujans penance, वराह्/महिषासुरमर्दिनी गुहा, Krishna butter ball
पांडव रथ - पल्लव राजांनी हे रथ पांडव इथे येतील म्हणुन बांधली आहेत. हे पाचही रथ एकाच दगडातुन वरुन खाली अश्या पद्धतीने कोरली आहेत. ह्याची दुसरी कथा - पार्वती, शिव, विष्णु, ब्रम्हा आणि गणपती ह्यांच्यासाठी ही मंदिरे आहेत कारण ह्या मंदिराजवळच सिंह, नंदी अन हत्तीही आहेत
गणपती / नकुल रथ
बाजुचा हत्ती
पार्वती/द्रौपदी रथ
शिव / अर्जुन रथ
विष्णु/ भीम रथ
ब्रह्मा / धर्मराजा रथ
सी शोअर टेम्पल - हे मंदिर समुद्राच्या किनार्यावर आहे. ह्या मंदिरात शंकर अन विष्णु - दोघे विरुद्ध दिशेला राहणारे- एकाच ठिकाणी आलेत. पुर्व पश्चिम दोन्ही बाजुला शंकराची पिंड , त्याच्यामधे विष्णु आहे असं सांगितल, आतमधे जायला बंदी आहे. मिठाच्या पाण्यामुळे ह्या मंदिराची झिज होतेय म्हणुन भारतीय पुरातत्व खात आता ह्यावर काचेचे आवरण घालावं असा विचार करत आहे. ह्या मंदिराभोवती १०८ नंदी कोरलेले होते पण आता ६०च उरले आहेत. ह्या मंदिरासारखी अजुन ४-६ मंदिर होती जी आता समुद्रात आहेत, त्सुनामीच्या वेळेस ह्या मंदिराचे तळ भाग दिसले होते. टुर गाईडने एक फोटो दाखवला ज्यात फक्त खालचे चौकोन दिसत होते
हे मंदिर बांधताना पल्लव राजांनी व्यापारासाठी इथे येणार्या चीनच्या लोकांची मदत घेतली असावी, इथे जो सिंह आहे त्याचा चेहरा चायनीज
अर्जुनाची तपश्चर्या : हा देखावा एकाच दगडावर अखंड कोरला आहे. हे शिल्प आशियातलं दुसरं मोठं शिल्प आहे , पहिलं अंगार्कोट कंबोडिआ!
कृष्ण गुहा - कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललंय , गायीच दुध काढतोय अशी शिल्प कोरली आहेत. पब्लिक फार मधे मधे फिरत होत त्यामुळे सगळे फोटो काढता आले नाहीत
ह्या खालच्या शिल्पात चार वेगळ्या देशाचे सिंह कोरलेत - भारत, रोम, रशियन अन चायनीज
महिषासुरमर्दिनी गुहा
Krishna butter ball : हा एक मोठ्ठा दगड एकाच टोकावर ४५ अंशाच्या कोनात एका पठारावर आहे. ह्याची कथा अशी - श्रीकृष्ण रोज लोणी खातो तेव्हा हे लोणी ओघळुन पृथ्वीवर आलंय. ब्रिटिशांनी ७ हत्ती वापरुन हा दगड हालवायचा प्रयत्न केला होता पण काहीही झालं नाही. इथेही फोटो काढता आला नाही कारण पब्लिक सेल्फी, गर्दी, शक्तिप्रयोगाचे पोझ देत होती!
खालचा फोटो गुगलवरुन साभार
फोटो एडिटिंगचे प्रयोग