चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत यावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो.
पाँडिचरीहुन परत जाताना हायवेच्या थोडसं आतमधे - २ तासाच्या अंतरावर महाबलीपुरम!
ह्या गावाच आताच नाव 'मल्ल्मपुरम' , महा बली - बळी देणे ह्याची भिती म्ह्णुन लोक इथे राहायला तयार नव्हती म्हणुन नाव बदललं असं टुर गाईडने सांगितलं
महाबलीपुरममधे सातव्या अन आठव्या शतकातील मोन्युमेंटस आहेत - पांड्व रथ , Descent of the Ganges, सी शोअर टेम्पल, Arujans penance, वराह्/महिषासुरमर्दिनी गुहा, Krishna butter ball
हंपी ट्रिपला सतराशे मेसेज केल्याने ध्वनीप्रदुषण कमी झालं होतं मग त्याची कमतरता भरुन काढायची म्हणुन ही ट्रिप! नै नै .. पोरी फार गुणाच्या बगा! एवढ्यांदा बडबड ही पोरांसमोर करावी लागते.. :straightface: .. अजुन नवीन नोकरीची जॉईनिंग तारीख आली नव्हती म्हणुन मला सुट्टी आहे .. मग अमोलच्या मागे भुणभुण केली की एक ट्रिप करुया! मग कुठे जायचं ह्यावर विचार सुरु :thinking: .. मी म्हटलं गोव्याला जाउ .. दरवर्षी जातो पण गेल्यावर्षी वारी चुकली! अमोल म्हणे नको जरा भारताबाहेर जाउयात .. मॉरिशस? की वेगास?( कोटीच्या कोटी ऊड्डाणं .. अधेमधे इंटर्व्ह्यु आले तर जाऊयात की नको ठरायचं होतं) :hypno: .
रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.