हंपी ट्रिपला सतराशे मेसेज केल्याने ध्वनीप्रदुषण कमी झालं होतं मग त्याची कमतरता भरुन काढायची म्हणुन ही ट्रिप! नै नै .. पोरी फार गुणाच्या बगा! एवढ्यांदा बडबड ही पोरांसमोर करावी लागते.. :straightface: .. अजुन नवीन नोकरीची जॉईनिंग तारीख आली नव्हती म्हणुन मला सुट्टी आहे .. मग अमोलच्या मागे भुणभुण केली की एक ट्रिप करुया! मग कुठे जायचं ह्यावर विचार सुरु :thinking: .. मी म्हटलं गोव्याला जाउ .. दरवर्षी जातो पण गेल्यावर्षी वारी चुकली! अमोल म्हणे नको जरा भारताबाहेर जाउयात .. मॉरिशस? की वेगास?( कोटीच्या कोटी ऊड्डाणं .. अधेमधे इंटर्व्ह्यु आले तर जाऊयात की नको ठरायचं होतं) :hypno: .
अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.
२०१४ च्या मार्च महिन्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.