हंपी ट्रिपला सतराशे मेसेज केल्याने ध्वनीप्रदुषण कमी झालं होतं मग त्याची कमतरता भरुन काढायची म्हणुन ही ट्रिप! नै नै .. पोरी फार गुणाच्या बगा! एवढ्यांदा बडबड ही पोरांसमोर करावी लागते.. :straightface: .. अजुन नवीन नोकरीची जॉईनिंग तारीख आली नव्हती म्हणुन मला सुट्टी आहे .. मग अमोलच्या मागे भुणभुण केली की एक ट्रिप करुया! मग कुठे जायचं ह्यावर विचार सुरु :thinking: .. मी म्हटलं गोव्याला जाउ .. दरवर्षी जातो पण गेल्यावर्षी वारी चुकली! अमोल म्हणे नको जरा भारताबाहेर जाउयात .. मॉरिशस? की वेगास?( कोटीच्या कोटी ऊड्डाणं .. अधेमधे इंटर्व्ह्यु आले तर जाऊयात की नको ठरायचं होतं) :hypno: . मला अचानक इथल्या पाँडिचेरी लेखाची आठ्वण झाली.. विमान तिकीट न हॉटेल बुकिंग बजेटमधे बसत होतं .. ४ दिवस निवांत ट्रिप होईल म्हणुन हे फायनल केलं! अमोलच्या मित्रांकडुन हेरिटेज, फ्रेंच हॉटेल्सची नावं मिळाली पण बुकींग फुल्लं! मग मेक माय ट्रिपवर FabHotel Esparan Heritage नावाचं हॉटेल सापडलं .. व्हाईट टाऊनपासुन १० मिनिटं लांब होत पण फोटो आवडल्याने कन्फर्म केलं! पुण्याहुन विमानाने चेन्नईला पहाटे पोचलो..जरा उजाडेस्तोवर एअरपोर्टवर बसलो(डास प्रचंड आहेत!).. मग तिथुन ओला कॅब करुन ECR Road ने पाँडिचेरी! हा रोड खुपच सुंदर आहे .. एका बाजुला समुद्रकिनारा .. दुसर्या बाजुला हिरवीगार झाडे.. अधेमधे बॅक वॉटर.. डबक्यातली कमळं! मिठागरं! एकच अडचण म्हणजे कॅब ड्राईव्हरला मोडकं तोडकं इंग्लिशही येत नव्हतं .. माझा एक कलिग तामिळ होतं त्यामुळे थोडे शब्द आठवत होते तेवढ्यावरच संभाषण! पाँडिचेरीत पोचल्यावर इतका त्रास झाला नाही कारण फिरंगी पब्लिक! तामिळ लोक इंग्रजी, फ्रेंच बोलत होते :surprise:
ज्यादिवशी पोचलो त्यादिवशी फक्त आराम केला .. हॉटेल फारचं मस्त आहे.. जुना वाडा! जुनं फर्निचरं!पेंटिग्ज वगैरे!
संध्याकाळी बेकर स्ट्रीट्मधे कॉफी न क्राँसा घेतलं मग रॉक बीचला गेलो .. तिथे संध्याकाळी ६ ते दुसर्या दिवशी सकाळी ६ पर्यंत वाहनांना प्रवेश बंद आहे(हे आम्हाला फार आवडलं) .. समुद्राच्या कडेने हा रस्ता असल्याने मस्त फिरता येतं ! रोजच संध्याकाळी इथे टिपी करुन फ्रेंच, इटालिअन जेवणाचा आस्वाद घेतला अन सकाळी दाक्षिणात्य जेवण ! सगळीकडे वुड फायर पिझ्झा होता तरी इथे पिझ्झा हट्च शॉप कसं चालेल असा प्रश्न पडला होता ! :ड
एक दिवस ऑरोविले बघुन आलो .. आत जायला २ दिवसांच बुकिंग होत त्यामुळे बाहेरुन्च बघितलं! ह्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन खुप मस्त आहे पण किती भारतीय इथे जातील शंका आहे.. सद्ध्यातरी फ्रेंच, जर्मन लोक दिसत होते
एक दिवस सुर्योदय बघायला सेरेनिटी बीचवर सकाळी पावणेसहाला गेलो होतो .. बरीच प्बलिक सेल्फी घेण्यात बिझी होती म्हणुन बहुतेक सुर्यदेव रुसले अन फारसे रंग न उधळता डायरेक्ट वरती आले! धुकं असल्याने पॉपिन्सची गोळीही झाले नाहीत :ड .. जनरली आम्हाला पाण्यात खेळण्यापेक्षा सकाळी शांत किनार्यावर चालायला आवडतं :) पण तमिळ लुंगी पब्लिक तिकडे प्रातर्विधी आटपत होते (कधी सुधारणार आपण!) मग तिथे थांबावसं वाटल नाही
पॅराडाईज बीचवरही जाऊन आलो पण ते फार लांब आहे .. जरा सुनसानंही वाटलं .. पोलीस होते पण भाषेचा प्रॉब्लेम! मग चर्चेस बघितली, अरबिंदो आश्रम, विनायक मंदिर, फ्रेंच कॉलनीत भरपुर फिरलो!
शेवटच्या दिवसाची सुरुवात ही हॉटेल शेजारच्या मंदिरातुन येणार्या सनई अन नादस्वरमच्या आवाजाने झाली.. सगळं आवरुन आम्ही त्या मंदिरात गेलो तर होम हवन सुरु होतं .. इथली सगळीच मंदिर देखणी आहेत.. फुलांची सजावट उत्तम पण सगळे बोर्ड तामिळ! तिरुपतीला नमस्कार करतोय की विष्णुला हेही कळतं नव्हतं पण भावना पोचल्या असाव्यात :)
चेन्नईला जाताना हॉटेल मॅनेजरकडुन कॅब बुक केली होती .. त्यांनी परतीचा प्रवास आखुन दिला ! Indian Sea Shell museum, महाबलीपुरम, दक्षिणचित्र बघायला सांगितलं होतं! हे म्युझिअम प्रायवेट आहे पण खुपच मस्त आहे.. जगभरात सापडतील इतके शंख शिंपले संग्रही ठेवलेत .. मोतीही आहेत.. १०० रु आत जायचं तिकीट न १०० रु फोटो काढायचं! महाबलीपुरममधे मंदिर, कोरीवकाम , गुहा , सी शोअर टेम्पल बघितलं - ह्या दोन्हीचे वेगळे धागे काढणार आहे :)
दक्षिणचित्र हे चोकी ढाणी सारखं आहे .. ४ राज्यांची जुनी घरं - हे बांधकाम केलेलं आहे ज्यात नीट फिरता येतं, सामान असं सगळं ठेवल आहे .. आम्हाला फारसा वेळ नव्हता म्हणुन थांबलो नाही .. पण एका दिवसाची पिकनिक होऊ शकते
फोटोफिचर :
चेन्नई एअरपोर्ट -
रॉक बीच
सेरेनिटी बीचवरचा सुर्योदय :
फ्रेंच कॉलनी
चर्चेस
ऑरोविले