अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.
२०१४ च्या मार्च महिन्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.
हा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे! त्याच्या बर्याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( :इश्श: ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .
अथिरापल्ली हे फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा! पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.
काही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं!
मला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्यातून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.