अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.
२०१४ च्या मार्च महिन्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.