अँडी आणि पाँडी! -
२०१४ च्या मार्च महिन्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.
पाँडीचेरी येथिल अरविंद आश्रम ( ऑरोविल)
मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक डॉक्युमेंटरी बघायला मिळते. त्यात आश्रमाची माहिती दिली जाते. त्यानंतर जवळजवळ सव्वा किमी दूर मातीच्या रस्त्याने चालत जाऊन मातृमंदिर बघता येते. वयस्क व्यक्ती, लहान मुले वगैरेंसाठी गाडी आहे. येताना सगळ्यांकरता बस उपलब्ध आहे.
हा तो रस्ता :
पोहोचलोच. :
आधी हा तिथल्या विस्तीर्ण मैदानातील पुरातन वटवृक्ष बघा. किती पारंब्या पुन्हा जमिनीत घुसून झाड वाढत गेलं आहे. मुख्य खोडाला कुंपण घातलं आहे.
मातृमंदिराकडे :
<
मातृमंदिर. हे आश्रमातील मुख्य ध्यानकेंद्र. इथे आपल्याला जाता येत नाही. फक्त लांबून बघता येते. हे आश्रमाच्या मध्यभागी बांधलेले आहे. आश्रमात राहणारे आधी बुकिंग करून इथे जाऊन ध्यान करू शकतात. आतमध्ये कोणत्याही देवतेची अथवा धर्माची आठवण होईल असे काही नाही. मधोमध फक्त एक स्फटिकाचा मोठा गोल आहे. अरविंद आश्रमात जगातील कोणालाही जाऊन राहता येते. आणि त्या शांत आणि प्रसन्न वातावरणात आपली अध्यात्मिक उन्नती करून घेता येते.
या आश्रमाच्या आजूबाजूला अनेक फ्रेंच, इटालियन छोटी छोटी रेस्तॉरंटस आहेत. आम्ही एका ठिकाणी मस्त वुड फायर्ड पिझ्झा खाल्ला.
पाँडीचेरीचे रीझॉर्ट आणि बंगालचा उपसागर :
होळीपौर्णिमेचा चंद्र :