चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत यावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो. भावगीतासारखा चार-पाच मिनिटात आवरणारा हा गायनप्रकार नव्हे.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle