सांज-केशर

समुद्रकिनारी मी वाळूवर
विचारात मन, नजर पाण्यावर
सांध्यचाहूल उमटे लाटांवर
केशर-शिंपण जळास्थळावर ||

गर्द केशरी सूर्य क्षितिजावर
केशर पाउली आली सांज नभावर
केशर शेला पांघरून सर्वांगावर
केशर गोंदण करीत तनामनावर ||

अशी घेई सांज केशर-विळख्यात
दिसभरीचा शीण बांधून पदरात
शांत रम्य निशेच्या स्वागता जणू
निसर्ग गातसे ही नांदी सुरात ||

जळात केशर - नभात केशर
नारळीच्या झावळीत केशर
उगवत्या चंद्रकोरीत केशर
शंख-शिंपल्यांच्या नक्षीतही केशर ||

निरोप घेई केशर-संध्या
गुंफुनी निशेच्या कर-करात
मीही उचलते पाउल तेथून
अलगद बांधून केशर पदरात ||

~ देवयानी गोडसे

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle