भरली वांगी हा प्रकार मला प्रचंड आवडतो! अर्थात वांगी अजिबात आवडत नाहीत! मग मी ती बाबा, नवरा ह्या लोकांना वाटुन टाकते. पण तो मसाला / रस्सा जो असतो तो
मी आख्खं आयुष्य ह्या खाली दिलेल्यातली ९०% रेसिपी फॉलो करत आले. परंतू आत्ता गेल्या समरला नणंद आली आणि तिने केलेली भरली वांगी खाऊन मी फ्लॅटच झाले. इतकी सुपर्ब झाली होती.. ती बरीचशी माझीच रेसिपी फॉलो करायची परांतू एक स्टेप वेगळी होती. मग तिची ती टीप वापरून मी करू लागले.
तर घ्या रेसिपी -
साहीत्य :
- ४-५ वांगी (त्यांना अधिक खुणेसारखे काप मारून पाण्यात टाकून ठेवा. नुसते ठेवले की ब्राउन होतात आतून)
- ३ कांदे (पूर्वी मी सगळे कांदे बारीक चिरून घ्यायचे. तेव्हा एव्हढे लागायचे नाहीत. आता नणंदेचे टीपेनुसार मी कांदे किसून घेते. त्यामुळे जास्त लागतात. ह्यातील २ कांदे किसून घ्या आणि १ बारीक चिरा)
- भरपूर दाण्याचा कुट (हवा असल्यास तिळकूट पण घ्या थोडं)
- चिंचेचा कोळ/टॅमरिंड सॉस वगैरे - हे आंबटपणावर आहे किती घ्यायचे. मी चिंचेचा कोळ कधीच वापरला नाही. मॅगीचा टॅमरिना सॉस मिळतो तो साधारण ३-४ चमचे घेते.
- भरपूर कोथिंबीर बारीक चिरून
- भरपूर लसूण बारीक चिरून
- गुळ बारीक चिरून (हा पण मला भरपूर लागतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या)
- काळा मसाला (मस्ट!!)
- कांदा लसूण मसाला
- तिखट मीठ
कृती:
- एका ताटलीत किसलेला कांदा घ्या, त्यात बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर, दाण्याचे कूट(तीळकूट), चिंचेचा कोळ, काळा मसाला, तिखट, मीठ इत्यादी घेऊन मिक्स करा. मस्त चटपटीत चव व्हायला हवी! (पूर्वी मी कांदा किसायचे नाही तेव्हा हा मसाला मी नुसता पण खाऊ शकायचे! आता चव स्ट्राँग लागते.) गुळदेखील ह्याच मसाल्यात घालतात कोणीकोणी, पण माझ्या डोक्यात पदार्थ शिजल्याखेरीज गूळ्/साखर अॅड करायची नाही हे फिक्स असल्याने मी शेवटी घालते.
- मसाल्याची चव मनासारखी जमली की तो वांग्यात भरा. वांग्यात भरून पण खूऽप मसाला उरायला हवा! :)
- मग कढई/ बेबी कुकर (बेबी कुकर फार बेस्ट!)वगैरे जे तुम्ही वापराल त्यात (तुमच्या आवडीनुसार) तेल घ्या आणि हिंग मोहरीची फोडणी करा. त्यात जो बारीक चिरलेला कांदा आहे तो परतून घ्या. मग कांदा लसूण मसाला घालून परता. (ऑप्शनल: एक हिरवी मिरची उभी चिरून घाला)
- मग त्यात वांगी घालून परता. तेलात वांगी परतली की रंग मस्त राहतो त्यांचा! मग त्यात बनवलेला(आणि उरलेला) मसाला जो असेल तो घालून भरपूर परता. (कच्च्या कांद्याच्या पेस्टची उग्र चव जाईल म्हणजे)
- मग रस्सा ज्या कन्सिस्टन्सीचा हवा त्यानुसार पाणी घाला, तिखट मीठ अॅडजस्ट करा आणि तुम्हाला वांगी कशी आवडतात त्यानुसार शिजवा. माझ्या बाबांना खूप शिजलेली आवडत नाहीत, थोडी कच्चट आवडतात. नवर्याला नीट शिजलेली. :)
- वरून भरपूर कोथिंबीर चिरून घाला..
- गूऴ अॅड करायचाच राहिला होता की. तो करा अॅड इथे.
- बरोबर गरम गरम पोळ्या, फुलके घ्या आणि खाऊन टाका! :dhakdhak:
एक फोटो सापडला, आधी केलेल्या भरल्या वांग्यांचा..