सौन्दर्य .................
हरिणीसारखे डोळे तुझे
नेत्रांजन लावत जा
मोत्यासारखे दात तुझे
क्लोजअप ने घासत जा
सुवर्णकांतीच अंग तुझं
साबणाने कोणत्या धुशील
संतूर लक्स रेकसोना
कि कॅमे वापरशील
त्वचा तुझी खासच गडे
कोल्ड क्रीम लावून जप
सर्दी पडश्यावर उपाय एकच
तो म्हणजे विक्स वेपोरब
पाय जप भेगांपासून
लखानि वापरत जा
भेगा पडल्याचं जर कधी
तर क्रॅक क्रीम लावून पहा
पण सखे हे क्षणभंगुर सौन्दर्य
खरंच का महत्वाचं
तुझं मनच नसेल सुंदर
तर ते शरीर काय कामाचं
जाताना जाणारा प्रत्येकजण
हे जपलेलं शरीरच घेऊन जातो
मनाचा मोठेपणा जाणलेला
मृत्युन्जय दिगंत कीर्ती ठेऊन जातो
by सुजाता लोंढे ( एडेकर )
बालकवी संमेलन १९९२
(हस्ते शांता शेळके आणि राजा मंगळवेढेकर )