भावना अचानक उचंबळून येतात
असं वाटतं जन्माला येतेय आता कविता,
शब्द घोंगावतात मनात
पण त्यांना असं एकात एक गुंफावं वाटत नाही
उधाणल्या समुद्राला सांगत का कोणी
की इथवरच लाट आण
तिथून मागे फिर
हां दुपारभरच गाज ऐकव तुझी
मग मन घट्ट मिटून ठेव.
तो आपला भरतीचा कल्लोळ अन
आहोटीची विरक्ती
दोन्हीची मनमानीच करतो!
मग मी पण होते ,
शब्दांच्या कल्लोळात बेभान
अन भावनांच्या घोळात विरक्त
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle