स्वर्णीम फुलांचे झुंबर
लेऊन निळे अंबर
अमलताश झुलतो दारी
अन त्यावर सनबर्डची स्वारी।।
अमलताश निष्पर्ण
तनुवर घोस सुवर्ण
सफेद खोडाच्या शाखांतुन
मंद चाले भृंगधून।।
चैत्र वैशाखाचे तोरण
दारी फुले बहावा
अन कोकिलकंठी सुस्वर
परस्परांना वहावा!!।।
दारी बहरला कॅशिया
लहडला लेऊन स्वर्णसाज
शकुन सांगे शुभाचा
कंठातून ध्वनी भारद्वाज।।
अंगणात एकतरी सोनमोहर झुलावा वैशाख वणव्यात
निष्पर्ण दुःख असूनही
फुलावे आतून बहरात।।
अत्ता येईल वळीव
बरसेल पुन्हा वर्षा
बहावा शहारतो दारी
साद घालतो पावशा ।।
पुण्य पेरा सत्व पेरा
धन्य आणि धनवान व्हा
देई हाळी आर्त पावशा
पेर्ते व्हा!पेर्ते व्हा!!!।।
रश्मी भागवत।।
ImageUpload:
