खाऊन एक संतरा
गायला त्यानं अंतरा
मोजताना तालाच्या मात्रा
जाणवला त्याला खतरा
मग,
एकतालाच्या दीडपटीत
भेळ चापली चटपटीत
तान घेऊन येता समेवर
गाडी पकडली लटपटीत
धागीनती नक धीं, धागीनती नक धीं
तिरकीट धा, तिरकीट धा, धीं धीं
दरवाज्याचे कुलुप उघडता
बेसुरल्या ज्या बोल-ताना
फ्रीजचे पाणी पीता पीता
मनी गुंजला गोड अडाणा
सा रे म प, नि म प, सां
सां ध नि प, म प ग म, रे सा
बडा ख्याल मग रंगत जाई
सोबत व्हिस्की आणि चकना
अलंकार एकेक उतरले
होरी, धृपद, धमार, तराणा
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
तानपुर्याच्या जुळता तारा
'गम', 'मनी', विसरून 'सारे'
सुस्तावूनी मग सुखे झोपला
उद्या सकाळी दुसरे गाणे