चिल्ड्रेन ऑफ हेवन...!

childrenofheaven.jpg

सारखे हॉलीवूड आणि बॉलीवूडपट पाहून डोळ्यांना त्या चकचकाटाची, हाणामारीची, गाणी, फालतू आयटेम साँग्स, कसली ना कसली तरी कटं-कारस्थानं, यांची इतकी सवय झाली होती, की हा पिक्चर पाहताना इतकं शांत आणि वेगळं वाटलं.. साधी पण सुंदर कथा.. साधं चित्रीकरण, साध्या लोकेशन्स..फार बरं वाटलं असं पाहून.. (सुरवातीला ते मीठ विकणार्या माणसाचं ओरडणं ऐकून तर भारतात पोचले मी!) .. इराण मधलं वातावरण, तिथले लोकांचे दारीद्र्य, झारा आणि अली इतके लहान असून त्यांचे घरकामात आई बाबांना मदत करणं.. झारा तर केव्हढीश्शी आहे! पण एक शाळा झाली की कुठे भांडी घास, नाहीतर लहान भावाला(बहीणीला) सांभाळ अशी कामं करत राहते..(झाराच्या डोक्यावर हिजाब पाहून तर कसंतरीच वाटलं.. कसं आयुष्य असेल ना तिथे मुलींचं?? Sad ) ते बुट हरवणं,दोघांनी मग अलीचे बुट शेअर करणं,ती पळापळ, पैसे नसल्यामुळे बाबांना कळू नये म्हणूनची धडपड..तो समजुतदार पणा.. शेवटी बुटांसाठी त्या स्पर्धेत ३रा येण्याची अलीची धडपड, आणि एवढं करून तो पहीला आल्यामुळे रडवेला झालेला तो.. सगळं अंगावर आलं ! :straightface:

खूप आवडला.. पण शेवट जरा उदासच वाटला.. म्हणजे झारा-अलीचे बाबा ते पांढरे बुट घेतात असं दाखवलंय.. म्हणजे बुट तर मिळतात, पण त्यासाठी अलीने केलेली धड्पड वाया गेली असं वाटतं.. तो पहीला आल्याचा आनंद तर नाहीच होत.. पण एकुणात सुंदर घेतलाय पिक्चर.. बराच आटोपशीर आहे.. गरज नसलेले सीन्स नाही आहेत.. उगीच लांबवला नाहीय, म्हणूनच जास्त परीणामकारक वाटला.. सगळ्यात आवडलं ते म्हणजे कास्ट! अली खूप इनोसंट आणि गोड घेतलाय.. त्याचे डोळे फार बोलके आहेत.. फार क्युट आहेत अली-झारा..( त्या दोघांचा आवाज पण गोड आहे!) मला अली-झारा चे बाबा पण आवडले.. दारीद्र्य, कुटुंब चालवण्यासाठी ते करत असलेले कष्ट, बायकोबद्दलचे प्रेम, सगळं इतकं छान दाखवलंय ना त्यांनी, आणि तेही कमी प्रसंगातुन.. फार आवडला तो ऍक्टर.. घरात चहासाठी साखर नसताना, मशीदीमधे चहा करत असताना त्यांना फुटलेलं रडू, आपल्या पण डोळ्यात पाणी आणतं.. गार्डनर म्हणून श्रीमंत वस्तीमधे जाऊन काम करताना त्यांच बावचळणं,काय बोलावं ते न सुचणं.. मस्तच घेतलयं! :talya:

काय काय इथे लिहून ठेवणार.. सगळाच पिक्चर लिहावा लागेल.. पण आता माजिद माजिदीचे सगळे पिक्चर पाहणं आलं.. त्याशिवाय बरंच नाही वाटणार! बरान का काहीतरी आहे ना? अजुन कोणते आहेत ते शोधायला लागावं आता...

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle