बंगलोरच्या शाळांना मुख्य मोठी सुट्टी दसऱ्याचीच.. त्यामुळे 'ही सुट्टी कुठे' यावर खलबतं सुरु झाली.. 'महाग पण pre-planned/टेन्शन फ्री केसरी-वीणा की आपलं-आपण प्लॅन/एक्सप्लोर करत जरा अडव्हेंचरस स्वस्त-मस्त ट्रीप' हा आमचा मुख्य वादाचा मुद्दा असतोच! यंदा बापाला लेकाची पण साथ मिळाल्याने ते जिंकले आणि ठरलं, आपलं-आपणच जायचं - पॉंडेचेरीला! श्रीअरविंद आश्रम/ मातृमंदिरमुळे मला आणि बीचेस आणि खादाडीसाठी लेकाला उत्सुकता होती. तर नवऱ्याला तिथलं जुनं अजूनही टिकून असलेलं फ्रेंच कल्चर खुणावत होतं.
खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. :whew: पुस्तक कुठाय? अं.. अॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्या नाहीत.