इथे पिअर वन, कॉस्ट प्लस वगैरे ठिकाणी खुप सुंदर गिफ्ट बॅग्स मिळतात. त्यातही वाईन बॉटल्स गिफ्ट द्यायला म्हणून अत्यंत सुंदर बॅग्स मिळातात. त्यातही बर्याच साडीपासून बनवलेल्या वगैरे वाटतात. मला त्या खुप दिवसापासून करायची इच्छा होती पण केल्या नव्हत्या. एकदा दारात एक पार्सल येऊन पोचले आत बर्याच छान छान ओढण्या कॉटन, ऑर्गॅन्झा वगैरे. सोबत एक पत्र - या माझ्या ओढण्या आहेत त्या सत्कारणी लाव. - मेधा!
ते पण पार्सल साधारण २ आठवडे तसेच इकडून तिकडे, तिकडून इकडे ठेवले गेले. मग ते करायचा पण कंटाळा आला मग अचानक 'लाईट बल्ब' मोमेंट आली! आणि मी एका ओढणीच्या वाईन बॉट्ल्स गिफ्ट बॅग्स करायच्या ठरवल्या. वाईनची बाटली समोर ठेवून मापे टाकली, एखादी बॉट्ल खूप फुगीर असेल तरी बसेल अशा तर्हेने अॅड्जस्ट केले. पण तेव्हा अजुन एक वाटले की शक्यतो यातील एकही चिंधी वाया जाऊ द्यायची नाही. मग कसे काय करायचे याचा विचार केला. बॅग साधारण १" उंच होईल पण एकही तुकडा वाया न जाता १२ बॅग्स होतील अशी मापे टाकली.
खालील कागद एक ओढणी आहे असे समजून मापे काढून दाखवते आहे -
मग खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे लाल रेघेवर १" दुमडुन शिवण घातली -
शिवण घातल्यावर असे दिसेल -
मग ती पट्टी कापडावर खाली नीट बसवून त्यावर शिवण घातली. यामुळे लेस ओवण्यासाठी नेफा तयार झाला.
आता ओढणिच्या लांबीमधे ६ तुकडे केले. ते सगळे 'Center' लाईन वर कापले. नेहेमी प्रमाणे पिशवी शिवली पण नेफा आहे तिथे कडेची शिवण घातली नाही कारण मला त्यात लेस ओवायची होती. पिशवीला थोडा बेस असावा म्हणून मग मी खाली १" बेस केला. मॅचिंग रंगाची सॅटीन रिबीन ओवली. अशा सगळ्या १२ पिशव्या पूर्ण केल्या.
सजलेली वाईनची बाटली -