इथे पिअर वन, कॉस्ट प्लस वगैरे ठिकाणी खुप सुंदर गिफ्ट बॅग्स मिळतात. त्यातही वाईन बॉटल्स गिफ्ट द्यायला म्हणून अत्यंत सुंदर बॅग्स मिळातात. त्यातही बर्याच साडीपासून बनवलेल्या वगैरे वाटतात. मला त्या खुप दिवसापासून करायची इच्छा होती पण केल्या नव्हत्या. एकदा दारात एक पार्सल येऊन पोचले आत बर्याच छान छान ओढण्या कॉटन, ऑर्गॅन्झा वगैरे. सोबत एक पत्र - या माझ्या ओढण्या आहेत त्या सत्कारणी लाव. - मेधा!
मला किडूक मिडुक वस्तू जमवून ठेवायची सवय आहे. गिफ्टचे रॅपिंग पेपर, जुने कपडे, जुन्या बेडशिट्स, टॉवेल, कागद, मणी, जुने ड्रेस, ओढण्या, नविन कुर्त्यांच्या बाह्या अशा अगणीत वस्तू! त्याचे काहीतरी करू म्हणुन ठेवलेले असते. अशाच माझ्या काही नविन कुर्त्यांच्या बाह्या मी जोडुन घेतल्या नाहीत त्या देशात कुठेतरी लोळत न ठेवता आठवणीने इकडे आणल्या होत्या. अशा ६-७ ड्रेसच्या बाह्या होत्या. त्या नीट कापून मागे इतर काम करताना उरलेले कापड लावून मी टी कोस्टर बनवले होते. ते एका इस्टकोस्ट ट्रिपमधे २-३ मैत्रीणींना गिफ्ट म्हणुन दिले. त्या अजुनही आठवणीने वापरतात. त्याची काही छायाचित्रे -