माझे पेपरचे प्रयोग (१)
____________________________________________________________________
पेपर हाच केंद्रबिंदू ठेवून ज्वेलरी आणि इतर कला वस्तू करताना आम्हीच आमच्या क्रिएटिव्हीटीला थोडे बांधून घातलय असे वाटू लागलं. पेपरची सोबत तर सोडायची नाहीच पण त्यासोबत आणि थोडे त्या व्यतिरिक्तही इतर काही माध्यमे वापरून पाहिलीत तर.... काहीतरी फ्युजन करून पाहूया असे ठरवले.
म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून याची सुरुवात केली. हो आणि याच मुहूर्तावर आमच्या लोगो मध्येही थोडा बदल केला. Creativity allows us to see Infinite Possibilities ह्या उक्तीवर आधारीत आमचे पुढचे प्रॉडक्ट्स असतील.. पूर्वीच्या लोगो मधील कॅण्डल सिम्बॉल काढून Infinite Possibilities साठी सिम्बॉलिक असा असीम आणि अक्षय प्रकाशाचा स्त्रोत.. सूर्य.. ग्राफिक स्वरुपात वापरलाय. :)
इथल्या काही मैत्रिणींना १५ एक दिवसात नवीन डिझाइन्स येतील असे एप्रिल मध्येच सांगितलेले पण आमच्या अपेक्षेपेक्षा या फ्युजन प्रयोगाला बराच वेळ लागला. सध्या पेपर अधिक वायर, थ्रेड, रेझिन इ. माध्यमे वापरली आहेत. वायरवर्क्स केलेली डिझाइन्स दिसायला देखणी दिसतात पण या माध्यमावर हात बसणे हे काम मात्र जिकिरीचे आणि खूपच कौशल्याचे आहे. हे करताना वल्लरीचे सफाईदार वायरवर्क आठवून तिला मनातल्या मनात अनेक दंडवत घातले. :) शिवाय आपल्या डोक्यात जश्या कल्पना असतात त्यापेक्षा कधीतरी वेगळेच डिझाईन बनून जाते. हे फ्युजन ईअरिंग्ज आधीच्या ईअरिंग्ज ईतके प्रो नाही झालेत. थोडक्यात काम मनासारखे झालेले नाहीय. :uhoh: त्यावर आमचे काम चालू आहेच. पण तरीही आमचा हा प्रयोग ईथे मैत्रिणींसोबत शेअर करु ईच्छिते.
डोक्यात अजून खूप कल्पना आहेत. त्यांना हळूहळू मूर्त स्वरूप देतोय.
त्या पूर्ण झाल्यावर ईथे शेअर करतच राहीन :)
हे नवीन डिझाईन्स
आणि हे एका मैत्रिणीच्या फर्माईशी नुसार करुन पाहिलय. :)
_____________________________________________________________________
ऑक्टो.२०१८ -
ही अजून काही नवी डिझाईन्स :)
FU_2018_006
FU_2018_00
FU_2018_008
FU_2018_009
FU_2018_010
FU_2018_011
_____________________________________________________________________
डिसें.२०१८ -