म्युचुअल फंड- अपना सपना मनी मनी-१

"काय म्हणावं बाई या महागाईला!! कालच्यापेक्षा आज जास्त तर आजच्यापेक्षा उद्या अजुन वाढलेली!!"

"काय सान्गता.. दुध ५० रुपये लिटर?? अहो, दहा वर्षापुर्वी २० रुपयला मिळायचं लिटरभर!"

"कितीही काटकसर करा, पैसा कमीच पडतो"

....ही आणि अशी वाक्य आजुबाजुला तुम्हीही ऐकली असतीलच ना मैत्रिणींनो?
मुळात पैसा कितीही कमवा, पुरतच नाही ही खंत प्रत्येकालाच सतावत असते. खर्च वाढलेत की महागाई हेच कळत नाही. आपणही श्रीमंत व्हावं, कसलीही चिन्ता न बाळगता खर्च करण्याइतके पैसे आपल्याकडे असावे अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यासाठी मग आपण बँकेत पैसे साठवतो, एफ डी करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही.
आपल्याला असे अनुभव येत असताना आपल्यापैकीच कोणितरी मात्र आर्थीक्द्रुष्ट्या अधिकाधिक सक्षम होताना दिसतो, अन मग सुरु होतो 'असं कसं बुवा??" या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रवास.

...... याच उत्तराचा शोध घेण्यात तुमची मदत करायला मी ही लेखमालिका घेउन येते आहे.

चला तर मग, करायची सुरुवात??

आधी आपण बघुयात, "पैसा" आणि "खर्च" आणि "महागाई"
आपल्याला विकत घेता येणार्‍या गोष्टी ज्याच्या बदल्यात विकत घेऊ शकतो तो पैसा, या विकत घेण्याच्या प्रोसेस्मुळे अपल्या पैशात जी घट होते तो खर्च आणि अमुक एक वस्तु घ्यायला आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणे म्हणजे महगाई.
जेव्हा महगाई वाढल्यामुळे खर्च करयला पैसा अपुरा पडु लागतो, तेव्हा होते आर्थिक तूट.

खर्चाबद्दल बोलायचं झालं, तर धोबळ्मनाने खर्चाला तीन भागात विभागुया:
१) जीवनावश्यक खर्च/ बेसिक एक्स्पेन्सेस
आरोग्य, अन्नधान्य, कपडेलत्ते, घर, वाहन, शिक्षण, गॅस इत्यादि

२) अत्यावश्याक/ इमर्जन्सि एक्स्पेनस
आजरपण, दवाखाना, कार्य, प्रवास इत्यादि

३) जीवनपद्धती/ लाईफस्टाईल एक्स्पेन्सेस
आरोग्य, अन्नधान्य, कपडेलत्ते, घर, वाहन, शिक्षण, मनोरंजन, प्रवास इत्यादि

यातल्या पहिल्या आणि दुसर्‍या प्रकाराशी तर आपली ओळख आहेच, पण हा लाईफ्स्टाईल एक्स्पेन्स काय आहे बरं?
यात तर सगळं तेच लिहिलं अहे जे जीवनावश्यक खर्चात लिहिलं आहे!!

आठवा ते दिवस, जेव्हा बिस्किट बोले तो पारलेजी असं समिकरण होतं. आणि आज.... मारी, गुडडे, ओरिओ, सन्फिस्ट, बिस्कफार्म, न्युट्रिचॉईस..... असंख्य प्रकार आहे.
फक्त सणावारांना नवे कपडे घेणारे आपण, आता हवे तेव्हा कपडे खरेदी करतो.
मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, गाड्या, किचन या सगळ्यातच जे अप्ग्रेडेशन झालं आहे, याला आपण लाईफ्स्टाईल एक्स्पेन्सेस म्हणु शकतो.

यासगळ्यासाठी लागणार्‍या पैशाचं नियोजन करताना सर्वसाधारणपणे सेव्हिन्ग अकौंट्ला पैसे साठवणे, फिक्स्ड डीपोसिट करणे या मार्गांचा अवलंब केला जातो.
पण वाढत्या महागाईशी समर्थपणे भिडायचं असेल तर आपलं उत्पन्नही वाढणं गरजेचं आहे. अर्थात इथं एन्ट्रि होते ती "आर्थिक गूंतवणुक" संकल्पनेचि!!!

जेव्हा आपण बँकेत पैसा ठेवतो, तेव्हा त्याची वाढ अपेक्षितच नसते. ते फक्त सेव्हिंग असतं. एफ डी आनि तत्सम ठेवींबाबत बोलायचं, तर त्यावर जे मिळतं ते व्याज. म्हणजेच आपण बॅकेला वापरायला दिलेल्या ठेवींच्या बदल्यात बँकेने अपल्याला दिलेलं भाडं.

गुंतवणुकीचं वेगळेपण म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशाचं मुल्यांकन वाढुन आपल्या भांडवलात वाढ होणे.

उदा. तुमच्याकडे एक पोतं गहु आहेत.
सेविन्ग अकौंट- गहू निट ड्ब्यात भरुन ठेवले आणि गरजेप्रमाणे वापरले.
ठेवी- अपल्याला लागतिल तितके गहू बाजुला काढुन उर्वरित गव्हातला काहि भाग दुसर्‍याना वापरायला दिला. त्याबदल्यात त्यांनी तुम्हाला व्याज देणे.

गुंतवणुक- उरलेल्या गव्हातला काहि भाग पेरुन त्यातुन गव्हाचं पीक घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गुंतवणुक

म्हणजे उत्पन्नातुन जिवनावश्यक खर्च करुन उरलेले पैसे त्यांची वाढ व्हावी म्हणुन शास्त्रीय पद्धतीने गुंतवणे म्हणज महगाईहोणेशी दोन हात करायला तयार होणे!!!!!!

क्रमशः

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle