काही वर्षांपूर्वी एका मेडिटरेनियन रेस्टॉरंटमध्ये हे डिप पहिल्यांदा खाल्ले आणि प्रचंड आवडले. ह्याचा उगम नक्की कुठला हे मला सुद्धा माहित नाही. कारण नेटवर ह्या डिपच्याच सिरीयन, लेबनीज आणि टर्किश व्हर्जन्स उपलब्ध आहेत. आता वळूया मी केलेल्या रेसिपीकडे :)
साहित्यः-
१. लाल सिमला मिरच्या ३/४- ह्या भाजून, साल काढून घ्यायच्या आहेत. आमच्याकडे भाजून, व्हिनेगारमध्ये घालून पॅक केलेल्या मिरच्या मिळतात, मी त्याच वापरल्या आहेत.
२. १/२ कप ब्रेडक्रम्स
३. १/२ कप अक्रोड
४. २ टि.स्पॉ लिंबाचा रस
४. ताज्या लाल मिरच्या (तिखटपणासाठी) चिली फ्लेक्ससुद्धा चालतील.
५. पोमोग्रॅनेट मोलॅसेस १ टे.स्पू.
६. लसूण पाकळी १-२ छोट्या, किसून.
७. मीठ चवीनुसार
कृती:-
१. लाल सिमला मिरच्या गॅसवर अथवा ओव्हनमध्ये भाजून घ्याव्यात. थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्यावे.
२. मिक्सरमध्ये मिरच्या आणि वर लिहिलेले सर्व घटक घालून मस्त बारीक पेस्ट करावी.
३. सर्व्ह करताना वरून ऑलिव्ह ऑईल घालावे.
४. डिपमध्ये बुडवण्यासाठी पिटा ब्रेडचे त्रिकोणई तुकडे करून अथवा लेबनीज ब्रेडचे हाताने तुकडे करून सर्व्ह करावे.
५. ह्या डिपची चव आंबटकडे झुकणारी, पण थोडीशी तिखट अशी असते.
ता.क. फोटोमध्ये उजवीकडे मुहाम्मेरा आहे. डावीकडे बाबा घनूष आहे. नॅचोज सेव्हन लेअर डिपसाठीचे आहेत