खरतरं हा आपला प्रांत नव्हे पण त्या पेरु(आयडी नव्हे) मुळे करायला लागलं .. बाजारातुन पेरु आणले पण खायचे विसरले.. मग त्यांना जरा वाईट वाटलं अन ते पिकुन पिवळ्सर झाले..सगळीकडे सुंगंध पसरवुन 'आता तरी मला खा' म्हणायला लागले! :ड
रेसिपी - पेरुंना स्वच्छ धुवुन फोडी करुन घेतल्या.. एका बाउलमधे थोडसं दही, चवीप्रमाणे मीठ्,साखर,जरासं दाण्याचं कूट घातलं.. मग त्यात पेरुच्या फोडी घालुन नीट मिक्स करुन घेतलं. छोट्या कढईत जिरे,हिंग, बारीक चिरलेली मिरची अन कढीपत्ता घालुन चरचरीत फोडणी केली.. अन त्या बाऊलमधे ओतुन त्यावर लगेच झाकण ठेवल .. सर्व्ह करताना चिमुटभर जिरेपुड अन मिरची पावडर(लाल तिखट) भुरभुरलं! :)
वेळ होता म्हणुन जरा फुड फोटोग्राफी केली
आधिक टिपा,बदल,सुचना आपल्या सुगरण मैत्रिणी देतीलच.. तेव्हा प्रतिसादांवर लक्ष राहु द्या :P