या गोड प्राजक्ताशी उन्मुक्त वात वाहे
सोडून भान सारे ती त्याचीच वाट पाहे ||
गाली गुलाब फुलले ओठात गीत आहे
का लाजते रती गं , तू त्याची प्रियाच आहे ||
डोळ्यातल्या स्वप्नांचा मनीही गाज आहे
तुझीच साथ द्याया चंद्र-चंद्रिका आज आहे ||
या शितल चांदराती तेवती तू वात आहे
भरेल ओंजळी ज्याची प्रकाशे, तो त्याचाच हात आहे
शांत नदीचा किनारा का गं खळाळत आहे ?
कि तुझिया मनाची हुरहूर तो दाखवीत आहे?
सांभाळ मदनिके गं चाहूल त्याचीच आहे
स्वप्नांना रंग द्याया आजची ही रात आहे
नको तिथवरी रमू गं त्यापुढेही वाट आहे
मीलन हे साधन पण साध्य अलौकिक आहे
~ देवयानी गोडसे