खरतर या दोन गोष्टीयेत
एक तुझी ,एक माझी
किंवा अजुनही बऱ्याच गोष्टीयेत
प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र गोष्ट
त्या एकमेकींना छेदतात
कधी क्रमशःचा जोड लावून घेतात
पण तरी त्या स्वतंत्र असतात नेहमीच
कधी तरी गोष्टींना स्वप्न पडतात
मग त्या स्वप्नात भेटतात एकमेकींना
हवी तशी बदलून घेतात स्वतःची गोष्ट
आता तू आपली गोष्ट लिहू म्हणतोस
या दोन वेगळ्या गोष्टी एकत्र शिवता येतील
तुझी माझी जोडून एक आपली गोष्ट,
सुबक गोधडी सारखी उबदार होईल
पण गोधडीची अट आहे ना एक
ती धडक्या कापडाची नाही शिवत
जीर्ण कापडाचे चांगले भाग जोडतात
कापड जितकं जूनं वापरलेलं
तितकी गोधडीला ऊब जास्त
तुझी गोष्ट झालीये का आता जुनी, जीर्ण?
एखादं जरीकाठचं स्वप्न उसवलय का तिचं?
माझी गोष्ट खोळंबलीये
विटका भाग टाकून आणि
तिच्या वाटचं चांगलं कापड घेऊन
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle