मुलांची सुट्टी असली कि त्यांना व्यग्र कसे ठेवावे हा मोठा प्रश्न असतो. कॅम्प असला तरी परत अर्धा दिवस घरी असतोच.
कालचा विकेंड हा कॉर्नर पीस करून सत्कारणी लावला. माझा सहभाग दगड शोधून द्यायला मदत करणे एवढाच होता. आमच्याकडे एक फिश टँक होता , त्यात हे रंगीबेरंगी दगड होते. फिश टँक सध्या काढून टाकला होता. त्यातले दगड आणि वनस्पती वापरली.
खाली काच किंवा काय वापरावे असा विचार करत असताना मुलाला एक कल्पना सुचली. खेळण्याच्या बॉक्सवर एका बाजूला
जी पारदर्शक प्लॅस्टीक शीट असते ती त्याने काढून आणली. सगळे साहित्य जमल्यावर मग काय फक्त चिकटवा चिकटवी त्याने केली
किती दिवस टिकेल माहित नाही , पण कालची दुपार कंटाळा न येता मजेत संपली.. सध्या गणपतीच्या आराशीमध्ये ठेवायचे घाटत आहे