या गो या गो कवितांनो
माझ्या संगे सोबतीला
शब्दा शब्दात गुंफोनी
भाव त्यातच ओतोनी
भाव सांगु कसा तुला
तुच समजून घे त्याला
साथ त्याला दे सुराची
जशी जोडी जिवाशिवाची
झाले गीत कवितेचे
चाल बांधून दे त्याला
तालातालात घुमू दे
ठेका धरायला लावू दे
अशी अशी ही कविता
जीवन आनंदी करू दे
प्रेम काव्यावर करू दे
काव्य जीवनी जगू दे
(चाल : काळ्या मातीत मातीत, तिफन चालते..)