छुम छुम छनन पैंजण घालुनि
कविता आली माझ्या अंगणी..
बाळपणीचे रूप घेऊनि, मोरपिसांचे स्वप्न घेऊनि,
आवळे चिंचा भांडुनि खाऊनि, लोभस निर्मळ रूप घेऊनि,
कविता आली माझ्या अंगणी..
तारूण्याचा आला बहर, अंगी जवानीचा जसा मोहोर,
सोनेरी क्षण उरी जपोनी, कुठेतरी हरवुनी जाऊनी,
कविता आली माझ्या अंगणी..
दिसू लागल्या तिन्हीसांजा, मावळतीला सूर्यही कलला
मारव्याचे सूर घेऊनी, अंतर्मुख ती होऊनी गेली,
कविता आली माझ्या अंगणी..