साहित्य - 5-6 मोठ्या पोपटी मिरच्या मध्ये चिर देऊन, 3-4 चमचे खोवलेला नारळ,दाण्याचं जाडसर कूट, तीळकूट, चमचाभर तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, 2 चमचे धनाजीरा पावडर, पाव चमचा हळद,चवीनुसार मीठ,अर्ध्या लिंबाचा रस आणि अंदाजे पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती - मिरच्या सोडून सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यायचे आणि हे तयार सारण मिरच्यांमध्ये व्यवस्थित दाबून भरायचे. जर फार तिखट खात नसाल तर मिरच्यामधल्या बिया सारण भरायच्या आधीच काढून टाका. आता फ्रायपॅनमध्ये थोड्याश्या तेलावर ह्या मिरच्या ठेवून बारीक गॅसवर वाफेवर मिरच्या होऊन द्यायच्या, पाच मिनिटांनी झाकण काढून मिरच्या पलटून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूनेपण पाच मिनिटभर मिरच्या वाफेवरच शिजू द्यायच्या. मिरच्या थोड्याश्या करपून दिल्या एकाबाजूने की अजूनच खरपूस लागतात म्हणून आता झाकण काढून दोनेक मिनिट मिरच्या खमंग होईस्तोवर परतून घ्यायच्या. तय्यार मिरच्या जेवणाची लज्जत नक्कीच वाढवतात तर करून बघा आणि तुमचं काही वेगळं व्हेरिएशन असेल तर तेही सांगा.