नारळाच्या दुधातील नारळी भात
साहित्य:
तांदूळ दोन वाट्या, गूळ दोन वाट्या, नारळाचे दूध दोन वाट्या, ओलं खोबरं एक वाटी, तूप चार चमचे, 7/8 लवंग, वेलची पावडर, बदाम, बेदाणे, मीठ, केशर किंवा केशरी रंग
कृती:
तांदूळ धुवावेत आणि निथळत ठेवावेत. नारळाचे दूध काढून घ्यावे. बदामाचे काप करावेत. कढईत दोन चमचे तूप तापवावे, त्यात लवंगा घालाव्यात. त्या तडतडल्या की धुतलेले तांदूळ घालून चांगले परतून घ्यावेत. परतलेले तांदूळ चार वाट्या पाणी आणि केशर घालून कुकरला लावून शिजवून घ्यावे. शिजलेला भात परातीत मोकळा करून ठेवावा. कढईत दोन चमचे तूप घालावे, दोन वाट्या गूळ, दोन वाट्या नारळाचे दूध, ओलं खोबरं घालावं, चवीसाठी मीठ घालावं. गूळ विरघळू द्यावा.गूळ विरघळला की मोकळा केलेला भात, बेदाणे, बदाम काप ,वेलची पावडर घालून नीट मिक्स करावे. पंधरा मिनिटं मंद गॅसवर छान वाफ काढावी. गरमागरम भात सर्व्ह करावा, नारळाच्या दुधामुळे भात मस्त खमंग लागतो.