बिबड्या ,ज्वारी पापड, शेवया

यन्दाच्या भारतवारित नेहमिच्या वाळवणाबरोबर जरा वेगळा पण बेगमिचा एवज मिळाला त्याचे नयनसुख
बिबड्या:-- फक्त खान्देशातच होणारा प्रकार आहे हा, ज्वारी,गहु भिजत घालुन त्याच्या चिक काढुन त्यात ओल्या मिरच्या,लसुण्,तिळ असा झणझणित मसाला घालुन शिजवला जातो , मिश्रण घट्ट असताना धोतरावर किवा काड्पावर( कापड नाही काडपच! म्हणजे गवताच्या सुक्या गन्जी पेन्ढ्या) थापुन त्याच्या बिबड्या केल्या जातात , तुरडाळीची खान्देशी खिचडी, चुलिवर भाजलेली बिबडी आणी भाजलेले दाणे , बहुतेक तरी रात्रिच्या जेवणाला हा बेत असतो.बिबड्या तळूनही चविष्ट लागतात, जास्त फुलतात पण भाजुन त्यावर तेल लावुन जास्त खाल्ल्या जातात.
आमचीच बिबडी ऑन्थॅटिक असा क्लेम बहुतेक प्रातात केला जातो त्यामूले नक्की कोणती वरिजनल ते आपल्यासारख्या प्राताबाहेर्च्या लोकाना कळणे मुश्किलच, खटाटोप जास्त असल्याने बहुधा व्यावसायिक मागणी पण आगवु ऑर्डर घेवुनच पुर्ण केली जाते ...
नेहमिच्या पापडापेक्षा जरा महाग असतात म्हणजे मला ओफ सिझन असल्याने ८०० रुपये शेकडा या भावाने मिळाल्या.( आइच्या मते या खुपच महाग आहेत )सिझनला आगौव ओर्डर देवुन हवे तस मिठ मिरची लसणाचे प्रमाण ठरवता येते.
image_6483441.JPG

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle