यन्दाच्या भारतवारित नेहमिच्या वाळवणाबरोबर जरा वेगळा पण बेगमिचा एवज मिळाला त्याचे नयनसुख
बिबड्या:-- फक्त खान्देशातच होणारा प्रकार आहे हा, ज्वारी,गहु भिजत घालुन त्याच्या चिक काढुन त्यात ओल्या मिरच्या,लसुण्,तिळ असा झणझणित मसाला घालुन शिजवला जातो , मिश्रण घट्ट असताना धोतरावर किवा काड्पावर( कापड नाही काडपच! म्हणजे गवताच्या सुक्या गन्जी पेन्ढ्या) थापुन त्याच्या बिबड्या केल्या जातात , तुरडाळीची खान्देशी खिचडी, चुलिवर भाजलेली बिबडी आणी भाजलेले दाणे , बहुतेक तरी रात्रिच्या जेवणाला हा बेत असतो.बिबड्या तळूनही चविष्ट लागतात, जास्त फुलतात पण भाजुन त्यावर तेल लावुन जास्त खाल्ल्या जातात.