मुळ्याचे मुटके:
साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून
दीड वाटी कणिक
एक वाटी रवा
एक वाटी बेसन
एक टीस्पून धने पूड
एक टीस्पून जीरे पूड
एक टेस्पून आलेलसूण पेस्ट
अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)
एक टीस्पून आमचूर
पाव टी स्पून खायचा सोडा
मीठ चवीनुसार
अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल
बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक)
कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा. एक वाफ आली की गार करण्यास ठेवावा. मुळ्याचा पाला, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, आले लसूण मिरची पेस्ट, धने-जीरे पूड, मीठ, आमचूर पावडर, सोडा हे सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. हाताला तेल घेऊन मुटके करून घ्या. चाळणीत केळीचे पान ठेवून किंवा चाळणीला तेलाचा हात लावून त्यात तयार मुटके ठेवा. पाणी घातलेल्या पातेल्यात चाळण ठेवून १५ मिनीटे वाफवा.
गार झाल्यावर गोल चकत्या करून घ्याव्या. मोहरी, तीळ, हिंगाची अर्धी वाटी तेलाची फोडणी करून त्यात मुटके परतून घ्याव्या. ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करा