आज माझ्या नवमैत्रिणीने अनुजाने आवडत्या पुस्तकाबद्दल लिहायला सांगितले आहे. तर माझा हा बाल प्रयत्न. मला लगेच सुचलेलं पुस्तक म्हणजे दुनियादारी लेखक सुहास शिरवळकर. मी वाचुन झाले त्याला 18- 19 वर्ष. तेव्हा मला खूप आवडली होती. तेव्हाच ही कादंबरी येऊन बरीच वर्षे झालीच होते. तरी देखील वाचताना जनरेशन गॅप जाणवत नव्हती.
पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेपासूनच पुस्तकाचं वेगळेपण लक्षात येत. आणि जेव्हा मी विकत घेतली ही तेव्हा त्याचा प्रत्येय देखील आला. मी वाचून एकाला ते पुस्तक दिले ते अजून 15 16 वर्ष झाली तरी परत मिळतेय आहे...
दुनियादारी मध्ये काय नाही कॉलेज, मैत्री, कट्टा, प्रेम , विरह ... सगळंच काही
श्रेयस दिग्याची मैत्री असू दे की, शेयस मिनू यांची न फुललेली प्रेमकथा, श्रेयस शिरीनच नात असो की त्यांचा दुरावा, श्रेयस राणीमा ह्याचं मायलेकरांचं नात असू की एम के आणि मीरा यांचं प्रेम आणि विरह.....
अपघातानेच श्रेयस आणि दिग्याची मैत्री होते. विरुद्ध स्वभाव असलेला श्रेयस सहज पणे कट्ट्यावर मिसळून जातो.. कॉलेज मधल्या गमती जमती आपल्या गुंतवून ठेवतात...
प्रत्येक पात्राची विचार पध्दत आहे मी मनाला भिडते. आपलीशी वाटते म्हणूनच एमके दर्द भरे गाणं पटतं तर अपर्णा ला पंरत घरी पाठवणं असू दे... त्याच नियमांनी सुरेखच लग्न किंवा मिनूला लग्नाचं न विचारणं असुदे प्रत्येकच बाजू खूप छान मांडली आहे.
ह्या पुस्तकातील स्त्री व्यक्ती रेखा खूप वेगवेगळ्या आहेत. मिनू, साधी भोळी तरीही शिरीन बद्दल असूया असणारी. ही अगदी आजूबाजूला दिसणारी अशी मिनू आहे. राणीमा, श्रेयशची आई , नवरा बायकोच्या भांडणात बळी पडते ती श्रेयसची, बालपणीत एकटा अलग होतो, त्याची कारण तिच्या भूतकाळात असतात मीरा सरदेसाई म्हणून... शिरीन ही वेगळीच मुलगी आहे तिचे व्यक्तिमत्व शांत बरोबरच खट्याळ आहे. तिची बोलायची विचार करायची प्रश्नाचे उत्तर शोधण्याची पध्दतच वेगळी.
पुस्तकाच्या शेवटी एक वाक्य आहे जे मला खूप आवडतं आभाळ आणि निवाऱ्या छप्पर ह्याच्या अजून ओळी आठवत नाहीये पण श्रेयस मिनूला सांगतो , तुझं आकाश मी असलो तरी निवाऱ्याच छप्पर धीरूभाई आहे आणि माझं आकाश तू असली तरी माझा निवारा श्रद्धा आहे.
बाकी अजून बरच आहे लिहायला पण हाताशी पुस्तक नाहीये. आणि अस काही लिहायचे सवयही.