लेकाच्या मित्रासाठी ही लिहिली. तयारच होती म्हणून इथेही टाकतेय. बॅचलर्स खिचडी असही म्हणू शकू
साहित्य
पाव किलो कोळंबी सोललेली.
दोन वाट्या तांदूळ
1 कांदा बारीक चिरून
4 लवंगा
3 चमचे लसूण पेस्ट
एक चमचा तिखट
पाव चमचा हळद
चवी प्रमाणे मीठ
तेल
नारळाचं दूध दोन वाट्या ( कोकोनट मिल्क)
पाणी दोन वाट्या
कृती
कोळंबी मधला काळा धागा काढून स्वच्छ धुवून घे. मग त्याला हळद, तिखट, पाव चमचा मीठ, लसूणपेस्ट लावून ठेव.
तांदूळ धुवून बाजुला ठेव.
कांदा चिरून घे.
दुसरीकडे मोठा कुकर ठेव. त्यात 4-5 चमचे तेल/ तुप टाक. लवंगा टाक. त्यात कांदा टाकून परत. आता त्यात कोळंबी घालून छान 4-5 मिनिटॆ परत.
आता त्यात तांदूळ टाक. पुन्हा 2 मिनिटं परत. आता गॅस बारीक करून पाणी टाक. नारळाचं दूध टाक. आता पाव चमचा मीठ टाक.
जरा चाखून बघ,पाणी थोडंसं खारट लागलं पाहिजे.
आता झाकण लावून तीन शिट्या कर कुकरच्या, दोन मिनिटं गॅस बारीक ठेव. मग विझव.
कुकर गार झाला की झाकण काढ. खिचडी तयार.
वरून कोथिंबीर टाक. लिंबु पिळ.
------
बॅचलर्स साठी बऱ्याच सोप्या रेसिपीज एका ब्लॉगवर लिहिल्यात. बेसिकली लेकासाठी लिहिलेला ब्लॉग आहे. सो काही मसाले अध्यारुत आहेत. पण कोणाला उपयोगी पडेेे तर, म्हणून लिंक देऊन ठेवते.
https://recipesfornikhil.blogspot.com