लेखिका - धारा
यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार, 'मानव नियंत्रित (directed) पद्धतीने घडवलेल्या जैविक उत्क्रांती' या विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल वरील तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. फ्रान्सिस अरनॉल्ड ह्यांचे संशोधन directed evolution of enzymes (विकरांच्या मानव नियंत्रित उत्पत्ती)बद्दल आहे. हे एन्झाईम्स जैवरासायनिक प्रक्रियेत catalyst(उत्प्रेरक)ची भूमिका बजावतात. त्यांच्या निर्मितीची सोपी पद्धत अरनॉल्ड ह्यांनी शोधून काढली आहे. आता या पद्धतीने नवनवीन catalysts तयार केले जातात. त्यांच्या या enzymes चा वापर पर्यावरणास अधिक अनुकूल असणार्या रासायनिक पदार्थांना बनवण्यात होतो. हे पदार्थ फार्मास्युटीकलमध्ये आणि जैविक इंधन उत्पादनामध्ये वापरता येतील.
शरीरात बाहेरून शिरलेल्या आणि शरीराला अपायकारक वाटणाऱ्या पदार्थांशी लढण्यासाठी मानवी शरीरात antibodies(प्रतिद्रव्ये)ची निर्मिती होते. ह्या antibodiesसाठीच्या प्रोटीन निर्मितीची सोपी पद्धत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी स्मिथ ह्यांनी शोधला असून विंटर ह्यांनी त्याचा कार्यक्षम औषधनिर्मितीत वापर केला.
थोडक्यात :
- कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डॉ. फ्रान्सिस एच. अरनॉल्ड या रसायनशास्त्राचा पुरस्कार जिंकणाऱ्या पाचव्या महिला शास्त्रज्ञ आहेत.
- डॉ. फ्रान्सिस अरनॉल्ड यांनी मेकॅनिकलव एअरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी, आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. तरी त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जैवरसायन अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे.
डॉ. जॉर्ज स्मिथ यांनी आपल्या संशोधनासाठी बॅक्टेरियोफेज किंवा बॅक्टेरियाला लक्ष्य करणार्या फेज नावाच्या व्हायरसचा वापर १९८०च्या सुमारास जसा जनुकांच्या निर्मितीसाठी केला जायचा तसा न करता या फेजला antibodies जोडून घेतील अशा प्रकारे करून 'phage display' नावाचे नवे तंत्र शोधून काढले. त्यामुळे फेजच्या मदतीने जनुकांची ओळख करणे सोपे झाले.
phage display तंत्र वापरून सर ग्रेग विंटर यांनी व्याधीनंतर तयार होणार्या antibodies ला थेट औषधी गुण दिले, त्यामुळे त्या विशिष्ट जीवाणू किंवा विषाणूचा मुकाबला करता येईल. त्यांचे अॅडॅलिमुमॅब या र्हुमाटॉइड आर्थ्राईटिसवरचे औषध आता सोरायसिस किंवा काही आतड्यांच्या विकारांवर वापरले जाते. या संशोधनाने काही प्रकारच्या कर्करोग आणि अल्झायमरसारख्या विकारांवरील औषधे सापडू शकतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
- रसायनशास्त्राचे हे 110 वे नोबेल आहे.
- Frances H. Arnold यांची मुलाखत
- George P. Smith यांची मुलाखत
- Sir Gregory P. Winter यांची मुलाखत
अधिक विस्तारीत स्वरूपात :
अजून माहितीसाठी :
- Frances Arnold यांचे वीकीपीडिया पेज
- George Smith यांचे वीकीपीडिया पेज
- Greg Winter यांचे वीकीपीडिया पेज
- रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची अधिकृत वेबसाईट
- Directed evolution चे वीकीपीडिया पेज
- Phage display चे वीकीपीडिया पेज
- Monoclonal antibody चे वीकीपीडिया पेज
संदर्भ :